पुणे रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना काय मिळणार ? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातनाम आहे. पण अलीकडे पुणे शहर एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत असते. पुणे शहर गेल्या काही दशकापासून वाहतूक कोंडीसाठी चर्चेत राहत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून कामानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक होत आहेत. यामुळे शहरातील आणि उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सध्या असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. सध्याचे रस्ते मार्ग देखील प्रवासासाठी अपुरे पडत आहेत.

यामुळे ट्रॅफिक जामची समस्या भीषण बनत चालली असून ही समस्या सोडवण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. सध्या शहरात फक्त सात ते आठ किलोमीटरचा प्रवास करायचा असला तरी देखील तासाभराचा वेळ लागत आहे.

अशा परिस्थितीत पुणेकरांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांचा प्रवास गतिमान बनवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. रिंग रोड हा प्रकल्प शासनाचा एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून यासाठी तब्बल 27 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यामुळे अनेकदा आपल्या टोमण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांच्या माध्यमातून पुणे रिंग रोड मुळे पुणेकरांचा काय फायदा होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनीच दिले आहे. अजितदादा यांनी पुणेकरांना पुणे रिंग रोड मधून काय मिळणार? या संदर्भात माहिती दिली आहे.

पुणे रिंग रोड मुळे काय होणार?

रिंग रोड हा प्रकल्प शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 27000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून येत्या काही महिन्यात या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे. हा रोड 170 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.

या रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. कारण की, या रोडमुळे बाहेरील वाहने शहरात प्रवेश करणार नाहीत. यामुळे ज्या लोकांना शहरात काम नाही असे लोक बाह्य रिंग रोडचा वापर करून थेट शहरा बाहेर जाणार आहेत. यामुळे अनेकांना पुणे शहरात येण्याची गरज पडणार नाही. साहजिकच यामुळे वाहनांची गर्दी कमी होणार आहे.

म्हणून हा रोड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली काढणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच उपमुख्यमंत्री महोदय यांनी “मी पण शेतकरी आहे, कुणाची शेती किंवा घर जाऊ नये, अशीच माझी भूमिका आहे. परंतु सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमिनीचे संपादन करणे गरजेचे आहे.” असे मत यावेळी व्यक्त केले आहे.

Leave a Comment