Mumbai News : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या कॅपिटल शहरांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मोठमोठे प्रयत्न केले जात आहेत. या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली सक्षम व्हावी आणि नागरिकांचा शहरांमधील प्रवास गतिमान व्हावा यासाठी मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे.
आतापर्यंत राजधानी मुंबई शहर आणि उपनगरात विविध मार्गांवर मेट्रो सुरू झाली आहे. मात्र नवी मुंबईकरांना अजूनही मेट्रोची प्रतीक्षाच आहे. परंतु आता नवी मुंबईकरांची ही प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच नवी मुंबई मधील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.
या मार्गामुळे 45 मिनिटांचा प्रवास फक्त पंधरा मिनिटात शक्य होणार आहे. जर तुम्ही नवी मुंबईमधील रहिवासी असाल तर तुम्हाला माहितीच असेल की तळोजा ते बेलापूर दरम्यान प्रवास करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. या मार्गांवरील प्रवासासाठी येथील प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते.
हेच कारण आहे की, शासनाने हा प्रवास आरामदायी बनवण्यासाठी या मार्गावर मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. सध्या तळोजा ते बेलापूर हा प्रवास करण्यासाठी 45 मिनिटांचा म्हणजेच पाऊण तासाचा कालावधी लागतो.
परंतु हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर हा कालावधी फक्त 18 मिनिटांवर येणार आहे. बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग प्रवासी सेवेसाठी सुरू केला जाणार आहे. हा मार्ग घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने हा मेट्रो मार्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान कोणत्याही दिवशी उद्घाटित केला जाऊ शकतो असा दावा केला आहे. एकंदरीत 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी येथे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.
पण हा कार्यक्रम राज्य सरकारकडून १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान, अर्थातच पंतप्रधान मोदी यांच्या सवडीनुसार आयोजित केला जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमातच मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन करण्याचे सिडकोने ठरवले आहे. यामुळे आता हा मेट्रो मार्ग लवकरच नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असे आशादायी चित्र तयार होत आहे.