मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ; Pune-Mumbai Expressway राहणार बंद ! कारण काय ? 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune-Mumbai Expressway : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील रहिवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट दैनंदिन कामासाठी मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष खास आहे.

खरंतर या दोन्ही शहरा दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. यामध्ये शिक्षणासाठी, कामानिमित्त, व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने दररोज जवळपास 60 हजार वाहने प्रवास करतात.

जेव्हा वीकेंड असतो म्हणजेच शनिवारी आणि रविवारी वाहनांची संख्या 80 हजारावर पोहोचते. हा महामार्ग 21 वर्षे जुना आहे. यामुळे सध्याच्या वाहतुकीसाठी हा महामार्ग अपुरा पडत आहे. हेच कारण आहे की हा महामार्ग सध्याच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरावा म्हणून मिसिंग लिंक प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.

शिवाय राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या महामार्गाच्या पुणे आणि मुंबईकडील दोन्ही दिशांना एक-एक लेन वाढवली जाणार आहे. यासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे काम अद्याप सुरू झालेले नाही. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

अशातच मात्र मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दुरुस्तीच्या कामांसाठी हा महामार्ग आज काही तासांसाठी बंद केला जाणार आहे. आता आपण हा महामार्ग किती तासांसाठी बंद असेल आणि हा मार्ग बंद करण्याचे कारण काय याविषयी जाणून घेणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दहा ऑक्टोबर 2023 रोजी हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तब्बल दोन तास वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. हा मार्ग अमृतांजन पुलाजवळ आज दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान बंद ठेवला जाणार आहे. अमृतांजन पुलापासून खंडाळा बोगद्यापर्यंत 45/000 पासून 45/800 किलोमीटरवर बंद ठेवला जाणार आहे.

या ठिकाणी ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्यामुळे हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भागात हा रस्ता बंद राहणार असल्याने मुंबईवरुन पुणे शहराकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावरच थांबवण्यात येणार आहे. तसेच यावेळी हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवली जाणार आहेत.

अर्थातच मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी बारा ते दोन पर्यंत बंद राहणार आहे पण पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक या काळातही सुरळीत सुरू राहणार आहे. निश्चितच हा महामार्ग दुपारी दोन तास बंद राहणार असल्याने याचा मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे.

प्रवाशांना थोडा काळ आज मनस्ताप सहन करावा लागू शकतो. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी पण होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रवाशांनी प्रवासादरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment