सोयाबीनच्या आगारात नवीन मालाला मिळाला ‘इतका’ भाव, भविष्यात कसे राहणार चित्र ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate 2023 : राज्यातील बहुतांशी भागात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. हार्वेस्ट केलेला माल देखील आता बाजारात येऊ लागला आहे. सध्या स्थितीला नवीन सोयाबीनची आवक कमी आहे मात्र तरीही बाजारभावात मंदी कायम आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत आले आहेत.

नवीन हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे. खरंतर गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळाला नव्हता. परंतु यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचे उशिराने आगमन झाले. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात झाली.

यामुळे ईतर पिकांऐवजी यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच जुगार खेळला आहे. गेल्या वर्षी कमी भाव असतानाही यावर्षी विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे आणि रोगराईच्या संकटामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आहे.

एकरी उतारा शेतकऱ्यांना खूपच कमी मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळेल असे वाटतं होते. मात्र आता नवीन सोयाबीनची बाजारात आवक होत असून नवीन मालाला म्हणावा तसा भाव मिळत नाहीये. सोयाबीन हे पीक मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते.

या पिकाला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. सध्या स्थितीला मात्र हे पिवळं सोनं शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे नवीन मालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. आज मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनची आवक झाली होती.

मात्र मार्केटमध्ये नवीन सोयाबीन फक्त 4200 रुपये प्रति क्विंटल या भावात विकले गेले आहे. अशा या कवडीमोल दरात पीक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नसल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत सोयाबीनच्या नवीन हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी फारशी अनुकूल नाहीये.

यामुळे आता भविष्यात सोयाबीनला कसा भाव मिळतो? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. काही जाणकार लोकांनी मात्र यावर्षी सोयाबीन उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने भविष्यात सोयाबीनचे भाव वाढू शकतात असे सांगितले आहे. शिवाय आता सणासुदीच्या काळामध्ये सोया तेलाची मागणी वाढणार आहे.

यामुळे सोयाबीन बाजारभावाला आधार मिळेल असे सांगितले जात आहे. परंतु आतापासूनच याबाबत अंदाज वर्तवणे थोडेसे घाईचे ठरू शकते. यामुळे सोयाबीन बाजाराची योग्य ती परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment