मुंबईकरांसाठी खुशखबर…! महापालिकेचा मोठा निर्णय, 16 हजार 621 कोटी खर्चून तयार होणार ‘हा’ नवीन सागरी किनारा मार्ग, कसा असेल रूटमॅप ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबईमधील जनतेसाठी एक अतिशय कामाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधील सागरी किनारी मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार असून शहरातील वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार आहे.

मुंबई ही मायानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, वाहनांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. याचा परिणाम म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. शहरातील विविध भागात मुंग्यासारख्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.

वाहतूक कोंडीची ही समस्या मुंबईकरांसाठी मारक ठरत आहे. अशा परिस्थितीत ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पावर काम केले जात आहे. विविध रस्ते मार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता मुंबईमधील सागरी किनारी मार्गाचा विस्तार होणार आहे.

वर्सोवा ते दहिसर दरम्यान सागरी किनारा मार्ग विकसित केला जाणार असून या कामाला आता गती देण्यात आली आहे. या 22 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाच्या कामासाठी नुकतीच निविदा जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम एकूण सहा टप्प्यात होणार असून यासाठी 16,620 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कसा असेल मार्ग ?

मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग थोडा उन्नत मार्ग राहणार आहे तर काही ठिकाणी हा मार्ग खाडी खालून जाणार आहे. हा रस्ता काही पट्ट्यात दुहेरी उन्नत मार्ग राहणार आहे. दुहेरी उन्नत मार्ग केबल स्टेड पुलासारखा बनवला जाणार आहे.

तसेच काही पट्ट्यात हा रस्ता खाडीखालून प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्याला गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड दिली जाणार आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक गतिमान होणार असून येथील वाहनचालकांना याचा मोठा फायदा होणार असा दावा पालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

दरम्यान, या नवीन विस्तारित सागरी किनारी मार्गाच्या बांधकामासाठी नुकतीच निविदा काढण्यात आली आहे. म्हणजे आता या प्रकल्पाच्या बांधकामासाठी उत्सुक असलेल्या कंपन्या यासाठी निविदा भरणार आहेत. अर्थातच बोली लावणार आहेत. यासाठी ११ सप्टेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.

या मुदतीत ज्या कंपन्या टेंडर भरतील त्यापैकी कमी बोली लावणाऱ्या कंपनीला या प्रकल्पाचे काम दिले जाणार आहे. यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला येत्या नोव्हेंबरपासून सुरुवात होऊ शकते, असा अंदाज तज्ञ लोकांनी बांधला आहे.

या सहा टप्प्यातील कामासाठी निविदा

महापालिकेच्या माध्यमातून या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्सोवा ते दहिसर दरम्यानचा सागरी किनारी मार्गासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. हा मार्ग एकूण सहा टप्प्यात पूर्ण केला जाणार असून सहा टप्प्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून निविदा काढण्यात आल्या आहेत.

यात वर्सोवा ते बांगूरनगर हा पहिला टप्पा राहणार असून यासाठी दोन हजार ५९३ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात बांगूरनगर ते माइंड स्पेस मालाड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणी केली जाणार असून यासाठी दोन हजार ९१० कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित राहणार आहे.

तसेच माइंड स्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडील बोगदा हा या प्रकल्पाचा तिसरा टप्पा राहणार असून यासाठी दोन हजार ९११ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात चारकोप ते माइंड स्पेस मालाड दक्षिणेकडील बोगदा या कामाचा समावेश असून यासाठी दोन हजार ९१० कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पाचा चारकोप ते गोराई हा पाचवा टप्पा असून यासाठी देखील दोन हजार ९९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा गोराई ते दहिसर हा सहावा टप्पा राहणार आहे आणि याच्या कामासाठी दोन हजार ६१२ कोटी एवढा खर्च लागणार असा अंदाज आहे.

Leave a Comment