मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे : रस्ते विकास महामंडळ महामार्गावर करणार ‘हे’ मोठे काम, 5 हजार कोटींचा होणार खर्च, वाहतूक कोंडी कायमची फुटणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Pune Expressway News : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून मुंबईला ओळखल जात. तसेच पुण्याला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. शिवाय पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते.

या दोन्ही कॅपिटल शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दरम्यान आता या महामार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावरील प्रवास गतिमान करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

खरंतर, हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 2002 मध्ये तयार करण्यात आला आहे. हा एकूण 94 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. हा मार्ग सहा पदरी आहे. 21 वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळी या मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी हा सहा लेनचा महामार्ग खूपच मोठा भासत होता.

त्यावेळी असणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता सहा पदरी महामार्ग पुरेसा होता. मात्र आता या महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दररोज 70 ते 80 हजार वाहने या मार्गावरून प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे वीकेंड असला अर्थातच शनिवारी आणि रविवारी या महामार्गावर वाहनांची संख्या 90 हजाराच्या घरात पोहोचते.

साहजिकच यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा अपघात देखील होतात. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक अति महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या दोन्ही बाजूंची एक-एक लेन वाढवणार आहेत. अर्थातच हा मार्ग आठ पदरी बनवला जाणार आहे. सध्या मुंबईच्या दिशेने तीन लेन जातात आणि पुण्याच्या दिशेने तीन लेन जातात. मात्र आता राज्य रस्ते विकास महामंडळ दोन्ही दिशेने एक-एक लेन वाढवणार आहे.

अर्थातच हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाण्यासाठी चार लेन आणि पुण्याकडे जाण्यासाठी चार लेन उपलब्ध होणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडी फुटणार असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाने या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे संबंधितांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.

तसेच केंद्राकडून या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाला की लगेचच याचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी जवळपास 5000 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.

या मार्गावर अतिरिक्त लेन वाढवताना अतिरिक्त जागेची आवश्यकता भासणार आहे. एम एस आर डी सी कडे थोड्याफार प्रमाणात जागा आहे मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या काही जागेसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच सध्या या मार्गावर असलेल्या बोगद्यांचा विस्तार केला जाणार नसून नवीन दहा बोगदे तयार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निश्चितच हे काम पूर्ण झाले तर मुंबई ते पुणे हा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत या मार्गावरून प्रवास करता येईल, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल आणि अपघात देखील कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

Leave a Comment