Mumbai To Goa Travel : आज विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. आज नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. तसेच पुढील महिन्यात बारा नोव्हेंबर पासून दिवाळीचा मोठा सण सूरु होणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळी सणाच्या आधीच मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोष्ट समोर येत आहे.
दिवाळी सणाला आणि नववर्षाला मुंबईहून कोकणात आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खूपच खासं राहणार आहे. कारण की, मुंबई ते गोवा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. खरंतर कोकण रेल्वे मार्गावर लागू असलेले मान्सून वेळापत्रक एक नोव्हेंबर 2023 ला संपणार आहे.
एक नोव्हेंबर पासून कोकण रेल्वे मार्गावर आता नॉन मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे. यामुळे, या मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग देखील वाढवला जाणार आहे.
यामध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील स्पीड वाढवला जाणार आहे तसेच या गाडीच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. सध्या स्थितीला मान्सून वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत आहे.
परंतु आता या गाडीच्या वेळापत्रकात बदल होईल आणि ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा धावणार आहे. यामुळे दिवाळी सुट्टीला आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचा सण आणखी आनंदात आणि उत्साहात साजरा होणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधान पाहायला मिळाले आहे. वास्तविक, पावसाळी काळात कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्यांचा कमाल वेग 75 किलोमीटर प्रतितास एवढा होतो. परंतु गैर पावसाळी हंगामात या रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवला जातो.
सध्या पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई येथील सीएसएमटी ते मडगाव दरम्यान चालवले जाणारी वंदे भारत ट्रेन दहा तासात हा प्रवास पूर्ण करत आहे. पण आता नॉन मान्सून वेळापत्रकानुसार वंदे भारत ट्रेन हा प्रवास फक्त सात तास आणि 45 मिनिटात पूर्ण करणार आहे. म्हणून या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास ऐन सणासुदीच्या काळात गतिमान आणि सुरक्षित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.