मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार ? खासदार धनंजय महाडिक यांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai To Kolhapur Vande Bharat Express : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ते राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांकडून जोर धरत आहे. खरंतर कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक भक्त कोल्हापूरमध्ये हजेरी लावतात.

देवी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी राजधानी मुंबई मधून देखील हजारो भाविक येतात. तसेच कोल्हापूर मधून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या देखील खूपच आहे. हेच कारण आहे की या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी आहे. खरं तर या मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे.

यामुळे ही एक्सप्रेस बंद असल्याने आता महालक्ष्मी एक्सप्रेस वर मोठा ताण येत आहे. अशा स्थितीत या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना हा प्रवास करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे सांगितले जात आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

महाडिक यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यात या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच या गाडीमुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास फक्त सात तासात पूर्ण होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

सोबतच या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. जर या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर कोल्हापूर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना देखील याचा फायदा होणार आहे.

कसं राहणार वेळापत्रक

मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुरू केली जाईल. ज्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस चे कोच अर्थातच डब्बे तयार केले जातात तेथे वंदे भारत एक्सप्रेसचे डब्बे जलद गतीने बनवले जात आहेत.

यामुळे येत्या काही दिवसात या मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते. दरम्यान या गाडीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. यानुसार ही गाडी कोल्हापूर येथून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल आणि मुंबईला बारा वाजून 56 मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात मुंबईतून सायंकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी ही गाडी कोल्हापूरकडे रवाना होईल आणि कोल्हापूरला अकरा वाजून 55 मिनिटांनी ही गाडी पोहोचेल असे सांगितले जात आहे.

5 तासांचा वेळ वाचणार

या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. परंतु खासदार महाडिक यांनी या मार्गावर येत्या दोन महिन्यात ही गाडी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. यामुळे लवकरात लवकर ही गाडी सुरू होऊ शकते. ही गाडी सुरू झाल्यानंतर प्रवासाच्या वेळेत तब्बल चार ते पाच तासांची बचत होणार असा दावा केला जात आहे. सध्या स्थितीला मुंबई ते कोल्हापूर प्रवासासाठी 11 ते 12 तासांचा अवधी लागतो मात्र ही गाडी सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त सात तासात पूर्ण होणार आहे.

केव्हा सुरू होणार गाडी?

खासदार महाडिक यांनी येत्या दोन महिन्यात ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचा कारण पुढे करत या मार्गावर मार्च 2024 नंतरच ही गाडी सुरू होणार असे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment