Mumbai To Pune Travel : मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई मधील मुंबई ट्रान्स हार्बर लींक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास सुसाट झाला असून मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांना देखील या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दिलासा मिळालेला आहे.
मात्र असे असेल तरी मुंबईहून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थातच अटल सेतूने प्रवास करून चिर्ले येथे आल्यानंतर तेथून पुण्याच्या दिशेने पुढील प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हेच कारण आहे की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी एलिवेटेड लिंक रोड तयार केला जाणार आहे.
दरम्यान याच लिंक रोड संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या लिंक रोडच्या कामासाठी शुक्रवारी म्हणजेच 9 फेब्रुवारीला गवारे कंस्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कंत्राट देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंत्राट मिळालेल्या या कंपनीच्या माध्यमातून येत्या महिन्याभरातच या कामाचा श्रीगणेशा केला जाणार आहे.
अर्थातच येत्या महिन्याभरात हे काम सुरू होईल आणि लवकरात लवकर हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या लिंक रोड प्रकल्प अंतर्गत चिर्ले ते कोन असा 6.5 किलोमीटरचा रोड तयार होणार आहे. विशेष म्हणजे यातील दीड किलोमीटरचा भाग हा पूर्णपणे निघून जाणार आहे.
यामुळे मुंबई येथून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकने आता मुंबई पुणे एक्सप्रेस-वे ला जाणे खूपच सोपे होणार आहे. यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षात म्हणजेच 30 महिन्यांमध्ये या प्रकल्पाचे काम संबंधित कंपनीला पूर्ण करायचे आहे.