Mumbai Vande Bharat Train : राजधानी मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन बाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे तेव्हापासूनच या गाडीबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
संपूर्ण भारतीय बनावटीची ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. ही देशातील एक वेगवान ट्रेन आहे. या गाडीचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. परंतु गाडीचा ऑपरेशनल वेग हा 130 किलोमीटर एवढा आहे. या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे.
तथापि या गाडीचे तिकीट दर हे सर्वसामान्यांसाठी परवडत नसल्याचा ओरड होत आहे. मात्र ही वस्तुस्थिती असली तरी या गाडीची लोकप्रियता तिकीट दर अधिक असतानाही दिवसेंदिवस वाढत आहे यात शंकाच नाही.
यामुळे देशातील विविध मार्गावर या गाडीला सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवली जात आहे. यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गावर ही गाडी चालवली जात आहे.
या मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. दरम्यान मुंबई ते गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान सुरू असलेल्या वंदे भारत ट्रेन बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. सध्या मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावत आहे.
परंतु ही गाडी एक नोव्हेंबर पासून आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जात आहे.
पण हे पावसाळी वेळापत्रक 31 ऑक्टोबर पर्यंतच राहणार आहे. त्यानंतर नॉन मॉन्सून वेळापत्रक लागू होईल. 1 नोव्हेंबर 2023 पासून कोकण रेल्वे मार्गावर नॉन मॉन्सून वेळापत्रक लागू होईल. त्यानंतर ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता 6 दिवस चालवली जाईल. एवढेच नाही तर पावसाळी काळात पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे या गाडीचा वेग देखील कमी करण्यात आला होता.
परंतु आता नॉन मान्सून काळात या गाडीचा वेग वाढणार आहे. सध्या पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे ही गाडी दहा तासात आपला प्रवास पूर्ण करत आहे परंतु जेव्हा नॉन मान्सून वेळापत्रक लागू होईल तेव्हा ही गाडी सात तास आणि 45 मिनिटात आपला संपूर्ण प्रवास पूर्ण करणार आहे. यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
वास्तविक, पुढील महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. यंदा 12 नोव्हेंबरपासून दिवाळी सण सेलिब्रेट केला जाणार आहे. दिवाळी सणाला मुंबईत स्थायिक झालेले कोकणातील चाकरमाने मोठ्या प्रमाणात गावाकडे जाणार आहेत.
अशातच मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा वेग वाढणार आहे आणि गाडी आठवड्यातून तीन दिवस ऐवजी सहा दिवस चालवली जाणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.