Nagar Beed Railway : महाराष्ट्रात गेल्या काही दशकांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी, दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी राज्यातील विविध भागात लोहमार्गांचे देखील कामे हाती घेण्यात आली आहेत.
नगर-बीड-परळी या 261.25 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले आहे. हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा लोहमार्ग म्हणून ओळखला जात आहे. या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दरम्यानचा प्रवास गतिमान होणार असून या दोन्ही विभागातील विकास सुनिश्चित होणार आहे.
यामुळे बीड जिल्ह्याची नगर जिल्ह्यासोबत कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामुळे शहरा-शहरांमधील अंतर कमी होईल आणि या भागातील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन, धार्मिक अशा विविध क्षेत्रांचा विकास सुनिश्चित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर हा रेल्वे मार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे.
विविध कारणांमुळे या रेल्वे मार्गाचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. मध्यंतरी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने देखील काही काळ काम थांबले होते. परंतु आता राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रकल्पासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे या मार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
नगर ते आष्टी हे काम पूर्ण झाले असून या टप्प्यावर गाडी देखील धावली होती. दरम्यान आता आष्टी पासून पुढचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लवकरच नगर ते बीड मार्गाची चाचणी होईल आणि लवकरच हा मार्ग रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
हा मार्ग पुढील वर्षात अर्थातच 2024 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर नगर ते आष्टी दरम्यान रेल्वे सुरू करण्यात आली होती मात्र मध्यंतरी या मार्गावर आग लागण्याची घटना घडली आणि यामुळे ही गाडी बंद करण्यात आली आहे.
परंतु नवीन आर्थिक वर्षात आष्टी ते विघनवाडी म्हणजे बीड हा मार्ग पूर्ण होऊन त्यावरून गाडी धावणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यामुळे नगर व मराठवाडा विभाग परस्परांना जोडला जाणार असून पुढे पश्चिम महाराष्ट्राचे देखील मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी सुधारणार हे मात्र नक्की.
यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रवाशांची यामुळे सोय होईल आणि राज्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत होईल. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि कृषी व उद्योग क्षेत्र यामुळे लाभान्वित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती काय
या प्रकल्प अंतर्गत 261.25 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग विकसित होत आहे. सध्या स्थितीला या रेल्वे मार्गाचा नगर ते आष्टी हा 66.18 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार आहे. यावर गाडी देखील धावली आहे. तसेच 195.25 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे यापैकी आष्टी ते विघनवाडी बीड हे 66.12 किलोमीटर लांब रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
तसेच यावर या चालू आर्थिक वर्षात गाडी धावणार असे संकेत मिळू लागले आहेत. तसेच विघनवाडी ते परळी हा 127.95 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या संपूर्ण रेल्वे मार्गाचे आतापर्यंत 78% काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी चे 99% भूसंपादन पूर्ण झाले असून या प्रकल्पासाठी 4805 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तसेच आतापर्यंत 3699 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.