शिंदे सरकारच शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ! राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार ‘या’ योजनेचे पैसे, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Scheme : महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सत्ता स्थापित केल्यापासून विविध निर्णय घेतले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्तमान सरकारने विविध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच एक रुपयात पिक विमा योजना यांसारख्या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा देखील समावेश होतो. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. दरम्यान आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना आणखी एका योजनेचा पैसा मिळणार आहे.

यामुळे यंदा राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत लवकरच पिक विम्याची अग्रीम रक्कम मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पिक विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशानंतर पिक विमा आगरी म्हणून पहिल्या टप्प्यात 1 हजार 700 कोटी रुपये वितरणास मंजुरी दिली आहे.

खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना दिवाळीपूर्वी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आता पिक विमा कंपन्यांनी पिक विमा नुकसान भरपाईची अग्रीम रक्कम वितरणात सुरुवात केली आहे.

याचा लाभ राज्यातील जवळपास 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे पीक विम्याची अग्रीम रक्कम कंपन्यांकडून वितरित करण्यास सुरुवात झाली असून ही रक्कम दिवाळी आधीच बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगितले जात आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती पीक विम्याची अग्रीम रक्कम मंजूर झाली आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

जिल्हानिहाय मंजूर झालेली पीक विमा भरपाई 

नाशिक जिल्ह्यात 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांसाठी 155.74 कोटी रुपये एवढी 25% पिक विमा अग्रीम रक्कम मंजूर झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील 16 हजार 921 शेतकऱ्यांसाठी चार कोटी 88 लाख रुपये पिक विमा अग्रीम मंजूर झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांसाठी 160 कोटी 28 लाख एवढी अग्रीम मंजूर करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1,82,534  शेतकऱ्यांसाठी 111 कोटी 41 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 74 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांसाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून 22 कोटी 4 लाख एवढी पिक विमा रक्कम मंजूर झाली आहे.

बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकऱ्यांसाठी 241 कोटी 21 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 39 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकऱ्यांसाठी 218 कोटी 85 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातल्या 1,77,253 शेतकऱ्यांसाठी 97 कोटी 29 लाख एवढी पिक विमा अग्रीम मंजूर करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकऱ्यांसाठी तेरा लाख रुपये एवढी अक्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यातील तीन लाख 70 हजार 625 शेतकऱ्यांसाठी 160 कोटी 48 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील चार लाख 41 हजार 970 शेतकऱ्यांसाठी 206 कोटी 11 लाख रुपयांची पीक विमा अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील ६३४२२ शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 21 लाख रुपये एवढी पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 535 शेतकऱ्यांसाठी 284 कोटी 87 लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील दहा हजार 265 शेतकऱ्यांसाठी आठ लाख रुपये एवढी पिक विमा आग्रीम रक्कम मंजूर झाली आहे.

Leave a Comment