मोठी बातमी ! सोयाबीन बाजारभावात मोठी सुधारणा, राज्यातील ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 6,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Bajarbhav Maharashtra : आज गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारस. आजपासून दिवाळीचा पावन पर्व खऱ्या अर्थाने सुरू होतो. मात्र, दिवाळी सुरू झाली असली तरी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळत नाहीये.

मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेती पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याशिवाय उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.

यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून त्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार अशी शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे. खरंतर, खरीपात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा 40% एवढा वाटा आहे. उत्पादनाच्या बाबतीत आपले राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश विराजमान आहे. तेथे देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. एकूणच काय की, सोयाबीन या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अवलंबित्व आहे.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांसाठी खूपच डोईजड ठरू लागले आहे. एकतर गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. किडींच्या आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे तसेच पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून बाजारात सोयाबीन दर दबावत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या चालू वर्षातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात नवीन सोयाबीनची आवक होत आहे. पण नवीन मालाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. गेल्या काही दिवसांपूर्वी तर सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात होते.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आणि दिवाळी सणाला पैशांची निकड असल्याने नाईलाज म्हणून कमी भावात माल विकावा लागत आहे. दरम्यान दिवाळीच्या पूर्वसंध्येवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे सोयाबीन बाजार भावात सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजार भाव 6500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार राज्यातील अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये काल अर्थातच 8 नोव्हेंबर 2023 रोजी सोयाबीनला किमान पाच हजार 501 रुपये, कमाल 6500 आणि सरासरी 6500 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

राज्यातील इतर बाजारांमध्ये मात्र सोयाबीन अजूनही पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा खालीच आहे. काही मार्केटमध्ये सोयाबीनला कमाल 5000 चा भाव मिळत आहे. मात्र बहुतांशी बाजारात अजूनही कमाल बाजारभाव 5000 पेक्षा खाली आहेत तर सरासरी दर 4000 ते 4800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहेत.

Leave a Comment