नागपूरकरांसाठी खुशखबर ! शहरात लवकरच सुरू होणार ट्रॉली बस, ‘या’ भागाला जोडणार, कसा राहणार रूटमॅप, नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur News : नागपूरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात लवकरच ट्रॉलीबस सेवा सुरू होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर शहरात मेट्रोची सेवा सुरू झाली आहे.

मेट्रोच्या सेवेमुळे शहरातील प्रवास गतिमान झाला असून शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवास अनुभवायला मिळत आहे. नागपूर मध्ये मेट्रो सुरू व्हावी यासाठी नितीन गडकरी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. दरम्यान आता नागपूरकरांना ट्रॉलीबस सेवेचा लाभ मिळणार असल्याचे संकेत गडकरी यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण नागपूर शहरात ट्रॉली बस सेवा कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे? यासाठी राज्य शासनाकडून किती निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे? याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गडकरी यांनी ट्रॉली बसबाबत दिली मोठी माहिती 

नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नागपूर शहरात ट्रॉलीबस सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही ट्रॉलीबस सेवा सुरू होणार आहे. खरंतर शहराचा विकास गेल्या काही दशकात झपाट्याने झाला आहे.

नागपूर हे विदर्भातील एक महत्त्वाचे शहर असून नागपुर विभागाचे केंद्रस्थान आहे. अशा परिस्थितीत या शहराची लोकसंख्या गेल्या काही दशकात विशेष वाढली आहे. लोकसंख्या वाढली असल्याने सध्या अस्तित्वात असलेली शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकड्या सिद्ध होत आहेत.

जरी शहराला मेट्रोची भेट मिळाली असली तरी देखील शहरातील काही भाग अजूनही मेट्रो मार्गाने जोडले गेलेले नाहीत. शहरातील काही मोजक्याच भागात मेट्रो धावत आहे. यामुळे ज्या भागात मेट्रो नाही त्या भागातील प्रवाशांना अजूनही प्रवासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शासनाच्या माध्यमातून ट्रॉलीबस सुरू केली जाणार आहे. या ट्रॉलीबस सेवेमुळे ज्या भागात मेट्रोची सेवा नाही त्या भागातील प्रवाशांना ट्रॉलीबसच्या माध्यमातून मेट्रोपर्यंत जाता येणार असून त्यांना मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे विदर्भातील ताकतवर नेते नितीन गडकरी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे, नागपूरच्या ट्रॉलीबस प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी निधीची तरतूद झाली असल्याने आता बस चालवण्यासाठी केबल लावण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

कसा असेल ट्रॉली बसचा मार्ग ?

ट्रॉलीबस संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार, ही बस काटोल नाका-एमआईडीसी हिंगना टी-पॉइंट-रिंगरोडमार्गे छत्रपती चौक-कळमना (पूर्व नागपूर)– कामठी रोड (उत्तर नागपूर)-छिंदवाडा मार्गाने काटोल नाका अशी धावणार आहे.

किती असणार तिकीट 

नागपूर मध्ये सुरू होणाऱ्या या ट्रॉलीबसची एक मोठी विशेषता राहणार आहे ती म्हणजे या ट्रॉलीबसचे तिकीट दर इतर सामान्य बसच्या तिकीट दरापेक्षा कमी राहणार आहेत. डिझेलवर धावणाऱ्या बसच्या तुलनेत ट्रॉली बसचे भाडे ३० टक्के कमी राहणार अशी माहिती देखील समोर येत आहे.

Leave a Comment