मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट ! सर्वाधिक लांबीचा मेट्रो मार्ग तयार होणार, थेट विरारपर्यंत धावणार मेट्रो, कसा असणार मार्ग ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या काही दशकांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने शहरातील आणि उपनगरातील सध्याची वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. अशातच आता मुंबईबाहेर देखील मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. या अनुषंगाने जेएनपीटी-नायगाव मेट्रो मार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

खरंतर हा मार्ग जेएनपीटी बंदरापासून सुरू होऊन नायगाव पर्यंत प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु या मार्गाचा पुढे विस्तार व्हावा अशी मागणी अनेकांची होती. दरम्यान आता हा मेट्रो मार्ग थेट विरार पर्यंत वाढवला जाणार आहे. राज्य शासनाने या मेट्रो मार्गाच्या विस्तारास नुकतीच मंजुरी दिली आहे.

या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार असल्याने विरारकरांना गतिमान प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना मेट्रो मार्गाने नवी मुंबई आणि उरण पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या जेएनपीटी बंदराचे काम चालू आहे. त्याच ठिकाणी जेएनपीटी ते नायगाव मेट्रो मार्ग देखील विकसित केला जात आहे.

अशा परिस्थितीत या मेट्रोचा विस्तार विरार पर्यंत केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली आहे. यामुळे विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरसह मेट्रो मार्गाचे काम सोबतच केले जाणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हा मार्ग सर्वात लांब मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. एकंदरीत जेएनपीटी-नायगाव मेट्रो मार्गाचा विस्तार आता विरार पर्यंत होणार आहे. यामुळे निश्चितच विरारकरांचा प्रवास सुरक्षित आणि सुसाट होण्यास मदत मिळणार आहे. हा मार्ग मुंबई महानगर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment