नगर, संगमनेरच्या बाजारात कांदा बाजारभावात सुधारणा ! मिळाला ‘हा’ विक्रमी भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Onion Market Price : फेब्रुवारी ते जून या काळात कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू लागला आहे. राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांशी बाजारात कांद्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे.

एकंदरीत मंदीतला बाजार आता तेजीत आला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांना ज्या बाजारभावाची अपेक्षा आहे तसा बाजार भाव अजूनही मिळत नाहीये. यामुळे जरी दरात सुधारणा होत असली तरी देखील हा भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही.

यामुळे दरात सुधारणा झाली असली तरी देखील बाजार तेजीत नसून अजूनही मंदीतच असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव दोनशे रुपयांपर्यंत वाढले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात सध्या एक नंबरच्या कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. वास्तविक शेतकऱ्यांनी दरात चांगली विक्रमी वाढ होईल म्हणून मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे.

पण बाजार भावात पाहिजे तेवढी वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होऊ लागली आहे. शनिवारी झालेल्या लिलावात जरूर 150 रुपये प्रति क्विंटल ते दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतची वाढ झाली आहे, पण यात आणखी वाढ झाली पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर?

हाती आलेल्या माहितीनुसार, नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात सुमारे ७८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती. यात एक नंबरच्या कांद्याला सतराशे ते दोन हजार शंभर रुपय प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे.

तसेच दोन नंबरच्या कांद्याला ११०० ते १७०० आणि तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. यासोबतच कांद्याच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील बाजारभावात सुधारणा झाली आहे. या मार्केटमध्ये 11 हजार 6 कांदा गोणीची आवक झाली होती.

यात एक नंबर कांद्याला किमान १ हजार ६०० ते कमाल २ हजार १५१ रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोन नंबर कांद्याला १२०० ते १५०० रुपये, तीन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये एवढा भाव मिळाला असल्याची माहिती एपीएमसीच्या माध्यमातून समोर आली आहे.

कांद्याला प्रति किलो 70 रुपयाचा भाव मिळणार 

बाजारभावात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र दरात अजून वाढ झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा असून दरवाढीची आशा बाळगून अनेक शेतकऱ्यांनी अजूनही कांद्याची साठवणूक करण्यास पसंती दाखवली आहे. अशातच काही मीडिया रिपोर्ट मध्ये या महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा आवकेत घट येईल आणि बाजारभावात मोठी सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे बाजार भाव 60 ते 70 रुपये प्रति किलो पर्यंत वाढतील असा देखील अंदाज आहे. त्यामुळे आता हा अंदाज खरा ठरतो का आणि कांदा उत्पादकांना खरच दिलासा मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment