Panjabrao Dakh: भारताचा विचार केला तर एकूण 36 हवामान विभाग आणि महाराष्ट्रामध्ये चार हवामान विभाग कार्यरत आहे. जर आपण हवामान विभागाचा विचार केला तर हवामान विभागाकडून विभागानुसार अंदाज वर्तवण्यात येत असतो. जर आपण भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाच्या अचूकतेविषयी विचार केला तर ती 85 ते 90% च्या दरम्यान आहे.

परंतु जर मागील काही वर्षांचा विचार केला तर शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाज बाबत परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील पंजाबराव डख यांचे नाव खूप विश्वासाने घेतले जाते. तसे पाहिले गेले तर मागील काही वर्षांपासून त्यांचे बरेचसे अंदाज हे खरे ठरल्यामुळे बरेच शेतकरी त्यांच्या अंदाजानुसारच शेती कामांचे नियोजन करीत असतात.परंतु यावर्षी मान्सून विषयी दिलेला अंदाज हा बऱ्याच ठिकाणी चुकीचा ठरल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

यावर्षी पंजाबरावांनी दिलेले अंदाज चुकले

यावर्षीचा विचार केला तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी सांगितले होते की या परिसरामध्ये 10 जून रोजी खूप पाऊस पडेल. एवढेच नाही तर दहा ते अकरा जून पर्यंत तुमच्या परिसरामध्ये जास्त पाऊस पडून खूप जास्त प्रमाणात पाणी देखील साचेल. परंतु 18 ते 19 जून आला तरी देखील या परिसरामध्ये पावसाचा एक थेंब देखील पडलेला नाही. असेच त्यांनी राज्याच्या बाबतीत वर्तवलेला अंदाज पाहिला तर त्यांच्या मते आठ जून पासून राज्यात पावसाला सुरुवात होईल.

Advertisement

परंतु अद्याप देखील महाराष्ट्र मध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. या अंदाजानुसार काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवड देखील केली. परंतु पाऊस न आल्याने इतर पर्यायी पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करून शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा वापर करून कपाशीला पाणी द्यावे लागत आहे. यावरून यावर्षीचा पंजाबरावांचा अंदाज संपूर्णपणे चुकीचा ठरल्याचे दिसून येते. या अंदाजाच्या विश्वासावर ज्यांनी कपाशी सारख्या पिकांची लागवड केली असेल आणि त्यांच्याकडे पाण्याची सोय नसेल तर बियाणे खराब होऊन शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

यावर काय म्हणतात पंजाबराव?

Advertisement

याबाबतीत काही माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना जेव्हा विचारण्यात आले की शेतकरी म्हणत आहेत की पंजाबरावांचा अंदाज चुकला आहे. यावर ते उत्तर देताना म्हणाले की पावसाचा अंदाज चुकला नसून चक्रीवादळ आल्यामुळे ते बाष्प घेऊन गेले. जर हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकले असते तर महाराष्ट्रात पाऊस झाला असता. त्यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न केला की तुमच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली आता त्यांनी काय करावे? यावर त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा असं मी नेहमी सांगत असतो. जमिनीमध्ये एक इंच ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.

हवामान अंदाजाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी कुणावर ठेवावा विश्वास?

Advertisement

भारतामध्ये एकूण 36 हवामान विभाग असून महाराष्ट्रामध्ये चार हवामान विभाग कार्यरत आहे. हवामान विभागाकडून विभागनिहाय अंदाज देण्यात येतो. हवामान विभाग एक हवामान अंदाजाचा विश्वासार्ह स्त्रोत असल्यामुळे त्यांच्या अंदाजाची अचूकता 85 ते 90 टक्क्यांपर्यंत असते. भारतीय हवामान विभागाचा अंदाज हवामानाच्या अंदाजाचा अधिकृत स्त्रोत असून याशिवाय राज्यातील कृषी विद्यापीठांच्या परिसरामध्ये देखील हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी देखील हवामानाचा अंदाज व्यक्त केले जातात. तसेच भारतामध्ये स्कायमेट ही एक खाजगी संस्था देखील हवामानाचा अंदाज देते. त्यामुळे इतर कोणी सांगितलेल्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवण्यापेक्षा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अधिकृत हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात काही बाबतीत स्वतःच्या अनुभवाचा वापर करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही व आर्थिक नुकसानी पासून आपण स्वतःचा बचाव करू शकु.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *