Crop Sowing: पाऊस लांबला ! नेमकी शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी? चांगल्या उगवणीसाठी किती ओल आवश्यक असते? वाचा तज्ञांचे मत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Sowing: जून महिन्याचे दोन आठवडे संपत आले तरी देखील महाराष्ट्रामध्ये मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातल्या त्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती देखील संथ झाली असून मान्सून कोकणातच रखडलेला आहे. सध्या जर आपण हवामानाचा अंदाज पाहिला तर राज्याच्या काही भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे बरेच शेतकरी बंधू या पावसामध्ये पेरणी करू शकतात. प

रंतु त्यानंतर जर पावसाचा खंड पडला किंवा पाऊस लांबला तर शेतकरी बंधूंवर दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी पेरणी करायला घाई करू नये अशा पद्धतीचे आवाहन कृषी विभागाकडून देखील करण्यात येत आहे. या अनुषंगाने नेमके किती पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी याबाबत काही तज्ञांनी मार्गदर्शन केलेले आहे.

 पेरणी नेमकी कधी करावी?

अरबी समुद्रात जे काही चक्रीवादळ तयार झाले होते ते 15 जून रोजी गुजरात किनारपट्टीला धडकले होते व त्यानंतर मान्सूनचा प्रवास अतिशय धिम्या गतीने होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. साधारणपणे 11 जूनला महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून अद्याप पर्यंत त्याच्या प्रवासामध्ये खूप काही प्रगती करू शकलेला नाही. याबाबतीत पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटच्यामाध्यमातून माहिती देताना म्हटले की, 18 ते 21 जून च्या दरम्यान मान्सून  पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते मान्सूनची जितकी प्रगती व्हायला हवी होती तितकी झालेली नाही.

त्यामुळे पावसात मोठा खंड पडलेला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी करणे योग्य नाही. त्यामुळे हवामानाच्या या परिस्थितीनंतर जर पाऊस सुरू झाला तर बरेच शेतकरी लागलीच पेरणी करायला सुरुवात करू शकतात. परंतु यामध्ये पाऊस नेमका किती पडला आहे हे पाहूनच पेरणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर जमिनीत चांगली ओल आल्यास पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून देखील करण्यात आलेले आहे.

याबाबत कृषी सहसंचालक तुकाराम मोटे यांनी दिलेल्या माहितीचा विचार केला तर दोन किंवा तीन दिवस सतत पाऊस पडला आणि तो 75 ते 100 मिलिमीटर झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कारण या प्रमाणात पाऊस झाला तरच जमिनीमध्ये चांगला ओलावा निर्माण होऊन पेरणीसाठी योग्य स्थिती निर्माण होते. इतका पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच काही तज्ञांच्या मतानुसार जमिनीत भरपूर ओल आल्याशिवाय पेरणी करणे टाळावे.

याकरिता दोन किंवा तीन चांगला पाऊस झाल्यावरच पेरणीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. याबाबतीत डॉ. रामचंद्र साबळे यांचा विचार केला तर त्यांच्या मते जमिनीमध्ये दोन ते अडीच फूट जेव्हा ओल जाईल तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अन्यथा दुबार पेरणीचे  संकट ओढवण्याची शक्यता असते. तसेच पेरणी करण्याआधी जितकी महत्त्वाचे आहे तितकीच बियाण्याची उगवण क्षमता देखील महत्त्वाचे असते. याकरिता गोणपाट पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी बियाण्याचे उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment