Namo Shetkari Yojana : शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य शासन आपपापल्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा देखील समावेश होतो.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर या नवीन योजनेची सुरुवात केली आहे. या नवीन योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरं तर या योजनेचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यासोबतच म्हणजे जुलै महिन्यातच देण्याचे नियोजन होते. मात्र शासनाचे हे नियोजन काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकले नाही.
आता मात्र या योजनेचा पहिला हप्ता हा दिवाळीच्या काळात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली असून यासाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.
अशातच नमो शेतकरी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर या संबंधित शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा धक्का राहणार आहे.
का बर लाभ मिळणार नाही ?
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 38 हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात मिळणारा नमो शेतकरीचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल 29 हजार 689 शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार नाही.
म्हणजे जवळपास 30,000 शेतकरी नमो शेतकरीच्या पहिल्या हफ्त्यापासून वंचित राहणार आहेत. यासंबंधीत शेतकऱ्यांनी नमो शेतकरीच्या लाभासाठी आवश्यक असलेली केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांना या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार नाही असे सांगितले जात आहे.
केव्हा मिळणार हफ्ता?
महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरीच्या पहिल्या हफ्त्याला मंजुरी दिली आहे. पहिला हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून कृषी विभागाला 1720 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कृषी विभागाला प्राप्त झालेल्या या निधीतून आता एप्रिल ते जुलै या कालावधीतील नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच वर्ग होणार असा दावा केला जात आहे. विशेष बाब अशी की, पीएम किसानचा 15वा हप्ता देखील दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे वृत्त समोर आले आहे.