दिवाळी झाली अन कांदा बाजारभावात तेजी आली! महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये मिळाला विक्रमी दर, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price News : भारतात नुकताच दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट झाला आहे. दिवाळी सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळीनंतर लगेचच राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे.

ती म्हणजे कांदा बाजार भावात पुन्हा एकदा मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान आहे. खरंतर कांदा फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात अगदी दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात विकावा लागला होता.

यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता. परिस्थिती एवढी भयावय होती की शासनाने कांद्यासाठी अनुदानाची घोषणा केली. फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये विक्री केलेल्या कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान शासनाच्या माध्यमातून दिले जात आहे.

अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार भावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. कांद्याचे बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून तेजीत आले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून कांदा बाजार भाव किमान डिसेंबर अखेरपर्यंत तेजीतच राहतील असा दावा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे.

व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे इजिप्त या देशाने कांदा निर्यात बंदी केली आहे. एक ऑक्टोबर पासून ही कांदा निर्यात बंदी करण्यात आली असून जवळपास पुढील तीन महिन्यांसाठी कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय इजिप्तने लागू ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे आता इजिप्त देशातून भारतात कांद्याचे आयात होणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे देशांतर्गत असलेल्या मालाला चांगला भाव मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान इजिप्त्याच्या या निर्णयाचे पडसाद देशांतर्गत बाजारपेठांवर उमटू लागले आहेत. बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून तेजित आहेत. आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभावात थोडीशी सुधारणा देखील झाली आहे.

कांद्याला काय भाव मिळाला ?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15136 क्विंटल लाल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 100, कमाल 6000 आणि सरासरी 3500 एवढा भाव मिळाला आहे.

Leave a Comment