बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार का ? हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रात काही दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामानात बदल होऊ लागला आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

खरंतर दिवाळी झाल्यानंतर नेहमीच राज्यात थंडीचा जोर वाढत असतो. यामुळे यंदाही दिवाळीनंतर हळूहळू थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही राज्यात म्हणावा तसा थंडीचा जोर वाढलेला नाहीये.

यामुळे यंदा थंडीची तीव्रता केव्हा वाढणार हा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पण आता गुलाबी थंडीसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होईल आणि गुलाबी थंडीची तीव्रता वाढेल असे सांगितले जात आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या हवामानाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर, भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून या कमी दाबक्षेत्राची आज चक्रीवादळात निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

यामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ महाराष्ट्रात पाऊस पाडणार का, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान याचबाबत माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ 18 नोव्हेंबर रोजी अर्थातच उद्या बांगलादेशच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाहीये.

यामुळे महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असे खुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच त्यांनी आज पासून राज्यातील मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. 

मध्य महाराष्ट्रातील नासिक, अहमदनगर, पुणे, खान्देशमधील नंदुरबार, जळगाव विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर तसेच गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजपासून हळूहळू थंडीची तीव्रता वाढू शकते असा अंदाज खुळे यांनी वर्तवला आहे.

त्यांनी येत्या दोन दिवसानंतर उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा येऊ घातलेले नवीन पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

परंतु 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे. ढगाळ हवामानामुळे या संबंधित भागांमध्ये कमाल आणि किमान तापमान थोडेसे वाढणार आहे. परंतु या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस होणार नाही, असा अंदाज त्यांनी दिला आहे.

Leave a Comment