Onion Rate Maharashtra : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. खरंतर कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे.
या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाडा अशा सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे पीक खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामात उत्पादित होते.
मात्र रब्बी हंगामाचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक घेतले जाते. देशाच्या एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर एकूण कांदा उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते.
यावरून महाराष्ट्राचा कांदा उत्पादनात असलेला प्युअर डॉमिनन्स आपल्या लक्षात येतोच. मात्र असे असले तरी कांदा बाजारातील लहरीपणा मात्र नेहमीच शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. कधी कांद्याला चांगला भाव मिळतो तर कधी कांदा अतिशय कवडीमोल भावात विकावा लागतो.
या चालू वर्षात देखील बाजारात हा लहरीपणा पाहायला मिळाला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांदा अतिशय कवडीमोल दरात विकावा लागला आहे. दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.
जवळपास जून महिन्यापर्यंत बाजारातील हा लहरीपणा कायम राहिला. जून महिन्यापर्यंत कांदा बाजार भाव दबावातच होते. जुलै महिन्या नंतर मात्र परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. आता गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला समाधानकारक असा भाव मिळत आहे.
मात्र यावर्षी लाल कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली असल्याने शेतकऱ्यांना विक्रमी भाव असूनही म्हणावा तसा फायदा मिळत नाहीये. पण सध्याचा भाव हा गेल्या काही महिन्यांपूर्वी असलेल्या भावापेक्षा बरा असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायाला मिळत आहे.
अशातच महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी थेट इजिप्त वरून समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार इजिप्तने पुढील तीन महिन्यांसाठी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.
एक ऑक्टोबर पासून पुढील तीन महिन्यांच्या काळासाठी इजिप्त मधून कांदा निर्यात होणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात कांदा दरवाढ होणार आहे. शिवाय या निर्णयामुळे इजिप्त मधून भारतात कांदा आयात होणार नाही.
डिसेंबरपर्यंत इजिप्त मधून भारतात कांदा आयात होणार नाही. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांदा दरात आता आगामी काही दिवस घसरण होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
बाजार अभ्यासाकांनी इजिप्तने घेतलेल्या या निर्णयामुळे बाजारसमित्यांमध्ये उन्हाळ कांद्यासह नवीन येणाऱ्या लाल कांद्याला मिळणारे भाव डिसेंबर अखेरपर्यंत तरी टिकून राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.