चिंताजनक ! कांदा बाजाराच रूपड बदललं, तेजीतला बाजार अचानक आला मंदीत; राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला कवडीमोल भाव, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : फेब्रुवारी ते जून या कालावधीत कवडीमोल दरात विकला जाणारा कांदा जुलैच्या सुरुवातीपासून समाधानकारक दरात विकला जातोय. राज्यातील जवळपास सर्वच बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. चांगल्या मालाला विक्रमी दर मिळत आहे.

परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. राज्यातील काही बाजारात कांद्याच्या कमाल बाजारभावाने 2500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर काही ठिकाणी कमाल बाजारभावाने तीन हजार रुपयांचा टप्पा गाठला.

राज्यातील बहुतांशी बाजारात कांदा 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विकला जात होता. अशातच मात्र काल झालेल्या लिलावात कांदा बाजारभावात मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग पहायला मिळत आहेत.

गेली पाच ते सहा महिने कवडीमोल दरात कांदा विक्री झाल्यानंतर बाजारात आलेली तेजी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणत होती. पण काल अचानक झालेल्या घसरणीमुळे कांदा बाजाराचा लहरीपणा पुन्हा एकदा उघड करत आहे.

या बाजारातील चढउतारामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की, काल अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याच्या लिलावासाठी सुप्रसिद्ध राहता एपीएमसी मध्ये दरात मोठी घसरण नमूद करण्यात आली.

कालच्या लीलावात राहता एपीएमसी मध्ये लूज कांद्याला कमाल एक हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे एक नंबर कांद्याला हा भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल 20 जुलै 2023 रोजी झालेल्या या एपीएमसीमध्ये प्रतवारीनुसार एक नंबर कांदा 876 ते 1000 रुपये, दोन नंबर कांदा 551 ते 875 रुपये, 3 नंबरचा कांदा 300 ते 550 रुपये प्रतिक्विंटल या दरात विकला गेला आहे. निश्चितच दरातील ही घसरण पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होणारी आहे. 

Leave a Comment