Panjab Dakh Havaman Andaj : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एका शेतकरी मेळाव्यात मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. या कार्यक्रमात त्यांनी पुढील काळात महाराष्ट्रात मान्सून कसा राहणार? पावसाला केव्हा सुरुवात होणार याबाबत एक मोठ भाकीत वर्तवल आहे.
पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात येत्या दोन दिवसात अर्थातच 24 जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. 24 जून ते तीन जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या कालावधीमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार असं त्यांनी सांगितलं.
या कालावधीत एवढा पाऊस पडणार की नदी नाले दूतर्फा ओसांडून वाहतील असं देखील त्यांनी नमूद केलं. तसेच 28, 29 आणि 30 जून रोजी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. निश्चितच लांबलेल्या मान्सूनमुळे आणि कमकुवत मान्सूनमुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पंजाब डख यांचा हवामान अंदाज नवीन उभारी देण्याचे काम करणार आहे.
जर डख यांनी सांगितल्याप्रमाणे 24 जून पासून ते 3 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस झाला तर पुन्हा एकदा शत शिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे. पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी बांधव नवीन जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने आणि कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिला आहे.
चांगल्या मान्सूनची लक्षणे कोणती?
डख यांनी या कार्यक्रमात मान्सून काळात चांगला समाधानकारक पाऊस केव्हा पडतो? चांगल्या मान्सूनची लक्षणे कोणती याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच 15 ते 30 मे दरम्यान अवकाळी पाऊस झाला तर हे चांगल्या मॉन्सूनचे संकेत असते.
तसेच मॉन्सून काळात विमानाचा आवाज येणे, एका गावातील लाऊडस्पीकरचा आवाज दुसऱ्या गावात ऐकू येणे, चिमण्यांनी धुळीत आंघोळ करणे, जांभुळ लवकर पीकने, अस्थमाच्या रुग्णांना दम्याचा त्रास होणे, दिव्यांवर कीटक पतंगे खेळणे, चिंचा जास्त येणे, कडुलिंबाच्या झाडाला जास्त लिंबोळ्या येणे ही सर्व चांगल्या मॉन्सूनची संकेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.