अहमदनगर जिल्हा विभाजन : अखेर खा. सुजय विखे पाटलांनी मनातलं सांगितलं ! ह्या एका कारणामुळं आहे विरोध…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. या मुद्द्यावरून राजकारण देखील सुरू झाले आहे. खरंतर गेल्या तीन दशकांपासून अहमदनगरचे विभाजन व्हावे अशी मागणी जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातून होत आहे. आकारमानाने मोठा असलेला हा जिल्हा विभाजित व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे. जिल्हा विभाजनावर सर्वांमध्ये एकमत आहे मात्र जिल्हा मुख्यालयावरून मोठे वाद आहेत.

एक गट जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर मुख्यालय श्रीरामपूर येथे झाले पाहिजे अशी मागणी करत आहे तर दुसरा गट जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर मुख्यालय संगमनेर येथे झाले पाहिजे अशी जोरदार मागणी लावून धरत आहे. यासाठी जिल्हा कृती समित्या देखील स्थापन झाल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

अशातच मात्र शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली आहे. नामांतराची पुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान, नामांतराचा निर्णयाला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी हे पद मंजूर करण्यात आले.

जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने पावले ?

विशेष म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येत आहे. यामुळे, नगरचे नामांतर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

तसेच नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डी येथे तयार करण्याचा डाव विखे पाटील यांच्याकडून साधला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निर्णयावर श्रीरामपूर आणि संगमनेर मध्ये तीव्र निषेध पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासकीय सोयीसाठी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले असून याचा जिल्हा विभाजनाशी कुठलाही संबंध नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर जिल्हा विभाजनावरून मतभेद ?

तसेच जिल्हा विभाजन झाल्यानंतर जिल्हा मुख्यालयाचा निर्णय घेऊ असे सूचक विधान त्यांनी मांडले आहे. म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा विभाजनाला पाठिंबा देत आहेत. अशातच मात्र सुजय विखे पाटील यांचे एक विधान अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात आता चर्चेत आल आहे. यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यात अहमदनगर जिल्हा विभाजनावरून मतभेद असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर जिल्हा विभाजनाला पाठिंबा दाखवत आहेत आणि आपल्या होमटाऊनमध्ये म्हणजेच शिर्डी मध्ये जिल्ह्याचे नवीन मुख्यालय बनवण्यासाठी दबक्या पावलांनी स्ट्रॅटेजी बनवण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. तर अहमदनगरच्या जिल्हा विभाजनावर खासदार सुजय विखेंनी याउलट भूमिका घेतली आहे. त्यांनी या मुद्द्यावर नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर जिल्हा विभाजनाला सातत्याने विरोध

त्यांनी शिर्डी येथे होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हा विभाजनाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा निर्णय लोकांच्या सोयीसाठी घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाला सातत्याने माझा विरोध राहिला असल्याचे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा विभाजन केल्याने जिल्ह्याची ताकद कमी होते, तसेच जिल्ह्याच्या एकत्रित राहिल्यानेच जिल्ह्याचा फायदा असल्याचं सुजय विखे यांनी यावेळी म्हटले आहे.

25 वर्षांपूर्वी कारखाना विखे गटाच्या विरोधातच !

दरम्यान यावेळी त्यांनी राहता येथील गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे गटाच्या दारुण पराभवावर देखील भाष्य केले आहे. त्यांनी सभासदांना जे योग्य वाटले त्यानुसार कौल दिल्याचे मान्य केले आहे. तसेच त्यांनी 25 वर्षांपूर्वी हा साखर कारखाना विखे गटाच्या विरोधातच होता म्हणून आता काही वेगळे झाले नसल्याचे नमूद केले आहे.

तसेच विजयी ठरलेल्या लोकांनी त्यांचा आनंद साजरा करावा असे त्यांनी सांगितले असून त्यांना काही गरज लागली तर आम्ही त्यांना मदत करू असेही यावेळी त्यांनी सांगितले. यासोबतच, आमदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांवर केलेल्या जोरदार टिकेबाबत त्यांना विचारले असता सुजय विखे यांनी ‘दोस्ती को रिश्तेदारी में बदलने का वक्त आयेगा, तो रिश्तेदारी मे बदलेंगे. तब तक दोस्ती चलने दो…’ असं सूचक वक्तव्य दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

योग्य वेळी सर्व काही होईल…

याशिवाय, जिल्ह्यातील काही आजी-माजी आमदार तुमच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी पक्षश्रेष्ठी पक्षाच्या हितासाठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहिल. तसेच आत्ताच मला एक कॉल येऊन गेला, काळजी करु नका, योग्य वेळी सर्व काही होईल असं सुजय विखे म्हणाले आहेत. यामुळे अहमदनगरमध्येही ऑपरेशन लोटस सुरू होत आहे का? असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

जिल्हा विभाजन संदर्भातील महत्वाच्या बातम्या

Leave a Comment