Panjab Dakh July 2023 Havaman : राज्यात 23 जून पासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पोषक वातावरण तयार झाल्यानंतर 24 जून रोजी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेतला आहे. आता राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. खरंतर, मान्सूनचे आगमन लांबले म्हणून शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत होते.
पण आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. मानसून आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला असून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
डख यांनी जुलै महिन्यात कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस पडणार याबाबत माहिती दिली आहे. याविषयी जाणून घेण्यापूर्वी मात्र आपण भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसासाठी अर्थातच 30 जून 2023 पर्यंत वर्तवेला हवामान अंदाज काय आहे? याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
काय म्हणतंय भारतीय हवामान विभाग?
IMD ने दिलेल्या नवीन अपडेट नुसार, आज 27 जून रोजी आणि बुधवारी म्हणजे 28 जून रोजी राज्यातील कोकण विभागातील पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
तसेच आज जळगांव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच उद्या म्हणजे 28 जून रोजी नाशिक, ठाणे, रायगड, सातारा, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय, गुरुवारी म्हणजे 29 जून रोजी पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे तसेच शनिवारी 30 जून रोजी रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ज्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्या भागात भारतीय हवामान विभागाने येलो अलर्टही जारी केला आहे.
काय म्हणताय पंजाब डख?
पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे 27 जून पासून ते 3 जुलै पर्यंत राज्यात एक दिवसाआड पाऊस पडणार आहे. विशेष बाब अशी की राज्यात 27 जून ते 29 जून दरम्यान म्हणजे तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाब डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. हे तीन दिवस नाशिक, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
तसेच डख यांनी जुलै महिन्यातील हवामान अंदाज देखील यावेळी सार्वजनिक केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यात 6 जुलै, 7 जुलाई, 8 जुलै आणि नऊ जुलै रोजी जोरदार पाऊस होणार आहे. याव्यतिरिक्त 14 जुलै ते 17 जुलै दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.