पंजाब डख यांचा अंदाज पुन्हा खरा ठरला; राज्यात पावसाला सुरवात झाली, आता पुढचा अंदाज काय? काय म्हणताय डख…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात मान्सून संदर्भात विविध अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात आहेत. यंदा मात्र जवळपास सर्वच हवामान तज्ञांचे अंदाज फेल ठरले आहेत.

आतापर्यंत जेवढे अंदाज भारतीय हवामान विभागाने तसेच इतर काही हवामान तज्ञांनी वर्तवले आहेत ते अंदाज तंतोतंत खरे ठरलेले नाहीत. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांचे देखील हवामान अंदाज मान्सूनच्या सुरुवातीला फोल ठरलेत.

डख यांनी जवळपास दीड महिन्यांपूर्वी यंदा राज्यात आठ जूनला मान्सून दाखल होईल आणि 22 जून पर्यंत राज्यात सर्वदूर मान्सूनचा पाऊस पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला होता. एवढेच नाही तर जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मात्र त्यांचा हा हवामान अंदाज फोल ठरला आहे. यंदा निसर्गाने त्यांच्या हवामान अंदाजाला चांगलीच हुलकावणी दिली आहे. आज 24 जून तरीही राज्यात सर्वदूर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही. पण पंजाब डख यांनी आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असा नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे.

त्यानुसार राज्यात हवामान देखील तयार होत असल्याचे चित्र आहे. काल राज्यातील काही भागात पाऊस देखील झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. यामुळे डख यांचा हवामान अंदाज खरा ठरल्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.

तसेच आगामी काळात हवामान कस राहणार? आणखी किती दिवस पाऊस कोसळणार याबाबत शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. याबाबत पंजाब डख यांनी देखील एक माहिती दिली आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आजपासून अर्थात 24 जून पासून ते दोन जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र भाग बदलत पाऊस पडणार आहे.

राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई आणि कोकणात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पेरण्या 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान पूर्ण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु शेतकरी बांधवांनी किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

Leave a Comment