Panjab Dakh News : भारतीय शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. जर चांगला मान्सून झाला तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळते आणि परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर मिळतो. पण जर मान्सून कमकुवत राहिला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते आणि याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो.
शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे तसेच दुष्काळामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु जर शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना मिळाली तर त्यांना डॅमेज कंट्रोल करता येत. अर्थातच शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळाला तर त्यांना त्यानुसार आपली शेतीची कामे करता येतात.
म्हणून भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून हवामान अंदाज दिला जातो. मात्र भारतीय हवामान विभागाच्या हवामान अंदाजाऐवजी राज्यातील शेतकरी बांधव पंजाब डख यांच्या हवामान अंदाजावर अधिक विश्वास ठेवतात. विशेष बाब अशी की, डख हवामान तज्ञ नाहीत तसेच ते हवामान विभागातील शास्त्रज्ञ देखील नाहीत. तरीही त्यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांच्या हवामान अंदाजावर राज्यातील लाखो शेतकरी आपल्या शेतीचे नियोजन करत असतात.
त्यांचा हवामान अंदाज नेहमीच खरा ठरत असल्याने पंजाब डख हे नाव सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत आहे. यामुळे पंजाब डख एक साधारण शेतकरी असतानाही हवामान अंदाज कसा वर्तवतात आणि त्यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रात एवढा लोकप्रिय का आहे? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान आज आपण मान्सून 2023 संदर्भात पंजाब डख यांनी काय अंदाज वर्तवला आहे तसेच ते हवामान अंदाज कोणत्या आधारावर वर्तवतात याबाबत जाणून घेणार आहोत.
मान्सून 2023 बाबत काय म्हणताय डख
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदाचा मान्सून हा खूपच चांगला राहणार आहे. यावर्षी गेल्या वर्षी प्रमाणेच पाऊसमान राहणार आहे. तसेच तीन जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस पडणार असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त 6 जुलै ते नऊ जुलै दरम्यान आणि 14 जुलै ते 17 जुलै दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील चांगल्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तवला आहे. एकंदरीत यावर्षी मानसून काळात कमी पर्जन्यमान राहणार असा अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पंजाब डख यांनी यंदा चांगला पाऊस बरसणार असे भाकीत व्यक्त केले असल्याने कोणाचा अंदाज खरा ठरणार याकडे सर्वांचेच बारीक लक्ष लागून आहे.
पंजाब डख हवामान अंदाज कसा वर्तवतात?
पंजाब डख यांनी हवामानामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी 1999 ला कॉम्प्युटरचा कोर्स केला. मग कॉम्प्युटरवर सॅटॅलाइटवर उपग्रहांच्या फोटोवरून हवामानाचा अभ्यास सुरू केला. उपग्रहांसोबत निसर्गाच्या पारंपरिक खाणा-खुणांच्या अभ्यासावरून हवामानाच्या बदलांचा अंदाज घेतला.
तेव्हापासून ते हवामान अंदाज व्यक्त करत आहेत. सुरुवातीला ते आपल्या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देत असत. मात्र हवामान अंदाजाची अचूकता पाहता पंजाब डख हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचल.
आता ते संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज वर्तवतात. त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज whatsapp च्या माध्यमातून तसेच यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. अलीकडे ते शेतकरी मेळाव्यात देखील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देतात. एवढेच नाही तर शेतीविषयक सल्ला देखील ते शेतकऱ्यांना देतात.