शेतकऱ्यांनो, मी पंजाब डख बोलतोय…! ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार; कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Weather Update : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. वास्तविक, राज्यात मान्सूनचे आगमन हे आधीच झाले आहे. मान्सून पोहोचलाय मात्र मोसमी पाऊस पडत नाहीये. शिवाय मान्सूनचा प्रवास देखील थांबला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे चिंता वाढत आहे. अशातच मात्र हवामान विभागाने 23 जून पासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

23 जून ते एक जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने नुकताच व्यक्त केला आहे. हवामान विभागासोबतच पंजाब डख यांनी देखील पावसासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आठ जूनलाच मान्सून आला. पण मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास थांबला होता.

मात्र आता चक्रीवादळ निवळत चालले आहे. यामुळे आता राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून पर्यंत चक्रीवादळ स्थिर होणार आहे. यानंतर 23 जून पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जूनला पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर विभागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

23 जून पासून ते दोन जुलै पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे.यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नागपूर, अकोला, यवतमाळ, मुंबई, नाशिक यासह संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी पेरणी होईल असा पाऊस पडणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर होईल असं मत डख यांनी व्यक्त केले आहे. हवामान विभागाने देखील येत्या दोन दिवसानंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केले आहे.

Leave a Comment