शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! सोयाबीन पिकात ‘या’ पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करा, अतिरिक्त उत्पन्न मिळणार, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Intercropping : भारतीय हवामान विभागाने 23 जून ते एक जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील 24 जून पासून ते दोन जुलै पर्यंत राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

एकंदरीत राज्यात आता येत्या दोन दिवसात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आता येत्या काही दिवसात पेरणी योग्य पाऊस पडेल असं हवामान विभाग आणि पंजाब डख यांनी नमूद केल आहे. अर्थातच शेतकऱ्यांची आता शेतशिवारात पेरणीसाठी लगबग वाढणार आहे. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी देखील शेतकरी बांधव पुढे सरसावणार आहेत.

खरतर सोयाबीन पिकातुन शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळत असल्याने याला येलो गोल्ड अर्थातच पिवळं सोनं म्हणून ओळखल जात. याची लागवड आपल्या राज्यात विदर्भ, मराठवाडा या दोन विभागातील बहुतांशी जिल्ह्यात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक यासह इतरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सोयाबीन पिकाची शेती पाहायला मिळते.

दरम्यान, यंदा मान्सून आगमनास विलंब झाला आहे. तसेच मान्सूनवर एलनिनोचे संकट राहणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीन पिकात आंतरपीक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, आज आपण सोयाबीन पिकात कोणते आंतरपीक घेतले पाहिजे याबाबत जाणून घेणार आहोत.

सोयाबीन मध्ये या पिकाची आंतरपीक शेती सुरू करा

कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरडवाहू सिंचन परिस्थितीत म्हणजे जेथे केवळ पावसाच्या पाण्यावर आधारित शेती होते. अर्थात जेथे रब्बी पीक घेणे शक्य नाही, तेथे सोयाबीनसह तूरीची आंतरपीक म्हणून लागवड केली जाऊ शकते. अशा भागात सोयाबीन मध्ये तूर आंतरपीक म्हणून लागवड करणे अधिक फायदेशीर आहे.

यासोबतच कृषी तज्ञांनी बागायती भागात सोयाबीनसह मका, ज्वारी, कापूस, बाजरी इत्यादी पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. बागायती भागात अशा पिकांची लागवड केल्यास रब्बी पिकांच्या पेरणीवर याचा परिणाम होणार नाही असं मत तज्ञ लोकांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे फळबागांमधील रिकाम्या जागेत म्हणजे आंबा, पपई, फणस, पेरू इ. फळबागेत सोयाबीनची आंतरपीक म्हणून लागवड करता येऊ शकते असे कृषी तज्ञांनी यावेळी सांगितले आहे. 

Leave a Comment