Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे.
हवामान खात्याने राज्यात 4 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यातून मान्सून माघारी फिरणार अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आली आहे.
दरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील 5 ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार असल्याचे सांगितले आहे. सोबतच पंजाबरावांनी ऑक्टोबर महिन्यातला आपला सविस्तर हवामान अंदाज देखील सार्वजनिक केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता 2 ऑक्टोबर पासून अर्थातच गांधी जयंती पासून कडक सूर्यदर्शन होणार आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोन ते पाच ऑक्टोबर दरम्यान राज्यात सर्वत्र कडक ऊन पडेल, हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. यानंतर मात्र राज्यातील हवामानात थोडासा बदल होणार आहे. ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.
5, 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, उदगीर, लातूर या भागात पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे.
पण या कालावधीमध्ये विदर्भातील यासंबंधीत जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल अर्थातच पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे.
परंतु पावसाची विश्रांती थोडा काळ राहील आणि त्यानंतर नवरात्र उत्सवात राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापना ते 24 ऑक्टोबर, विजयादशमी दरम्यान साजरा केला जाणार आहे.