8 ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, पंजाबरावांचे मोठे भाकीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज वर्तवत राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असे सांगितले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.

महाराष्ट्रात सहा आणि सात सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. एवढेच नाही तर 9 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस कायम राहणार असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे. मात्र 9 सप्टेंबर नंतर राज्यातील फक्त कोकण विभागातच पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर राज्यात ऑगस्ट महिन्यात एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये केवळ चार ते पाच दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला होता. यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः उन्हाने होरपळली होती.

अनेक भागातील पिके करपलीत. मात्र आता या चालू सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. खरीप हंगामातील पिकांना यामुळे जीवदान मिळणार असे सांगितले जात आहे.

अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी राज्यात 8 ते 10 सप्टेंबर पर्यंत राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीमध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात ओढे-नाले वाहतील असा पाऊस या कालावधीत पडणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

या कालावधीमध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहून आपली शेतीची कामे करावीत असे आवाहन देखील यावेळी पंजाबरावांनी केले आहे. याव्यतिरिक्त राज्यात 12 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची आतुरता लागून आहे.

यामुळे जर पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला आणि महाराष्ट्रात या कालावधीमध्ये चांगला पाऊस झाला तर आगामी रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल असे मत व्यक्त होत आहे. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरण्यास मदत होईल आणि धरणांमधील जलाशयाचा साठा वाढेल असे देखील मत व्यक्त होत आहे.

हा पाऊस दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्राला दुष्काळाबाहेर ओढण्यास मदत करेल आणि महाराष्ट्रातील पाणी संकट बहुतांशी प्रमाणात कमी होईल असा आशावाद देखील यावेळी व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि आठ ते 12 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment