Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.
मान्सूनचा जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ उलटला आहे तरी देखील राज्यातील काही भागात मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी बांधव मुसळधार पावसाची आतुरतेने वाट पाहत असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दरम्यान पावसाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे राज्यात आता 16 ते 20 सप्टेंबर या काळात खूप मोठा पाऊस पडणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे या काळात राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा महत्त्वाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
यामुळे निश्चितच राज्यातील सर्वसामान्य जनतेला तसेच शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहून कामे करावी लागणार आहेत. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आता पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात 16 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर या कालावधीत नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर, खान्देशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये खान्देशमध्ये, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर या भागात तसेच विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या अतिवृष्टीमुळे राज्यातील उजनी, मांजरा, जायकवाडी यांसारख्या प्रमुख धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक वाढणार आहे. एवढेच नाही तर या कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यातील छोटी-छोटी धरणे 100% क्षमतेने भरून जातील असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.