Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता पावसाने सर्वत्र उघडीप दिली होती. गेल्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला.
खरतर जुलै महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला होता. यामुळे जुलै महिन्यात पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
यामुळे आता ऑगस्ट महिन्यात कस हवामान राहणार, पाऊस उघडीप देणार का ? याबाबत पंजाबरावांनी काय मत व्यक्त केले आहे. ऑगस्ट महिन्यातील पंजाबरावांचा हवामान अंदाज काय आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागू नये. वास्तविक, काल भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस पडेल असे मत आयएमडीने व्यक्त केले आहे. कमी दाबाचा पट्टा आता निवळत चालल्याने पावसाचा जोर कमी होणार असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केले असून राज्यात पुढील दोन आठवडे कमी पावसाचा अंदाज आहे.
निश्चितच भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. जुलै महिन्यात पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले मात्र आता ऑगस्ट महिन्यात पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे.
दरम्यान, पंजाबराव डख यांनी आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 30 जुलै पर्यंत पाऊस पडणार आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी पंजाबरावांनी जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय यावर्षी पावसाचे उशिराने आगमन झाले असल्याने पाऊस महाराष्ट्रातून उशिराच जाणार आहे. अर्थात यंदा उशिराने थंडी येणार आहे.
दरम्यान ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होणार असा अंदाज गेल्या काही दिवसांपूर्वी डख यांनी व्यक्त केला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो का पंजाबरावांचा हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.