Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या पाणी संकट पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात जवळपास 20 ते 22 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात असं घडतंय जे 125 वर्षांपूर्वी घडलं होत.
म्हणजेच सव्वाशे वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात ही विपरीत परिस्थिती आली आहे. मात्र या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता खरीप हंगामातील पिके अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळून खाक होऊ लागली आहेत. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याची भीती आहे.
एवढेच नाही तर ज्या फळबाग उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता नाही त्या शेतकऱ्यांना देखील आता भीती वाटू लागली आहे. कारण की विहिरीने तळ गाठला आहे आणि शेततळ्यात साठवलेले पाणी देखील आता संपत चालले आहे. यामुळे डाळिंब, द्राक्ष यांसारखे पिके घेणारे शेतकरी देखील संकटात आले आहेत.
विशेष बाब अशी की जर येत्या काही दिवसात मोठा पाऊस पडला नाही तर राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येणार असल्याचे मत तज्ञ लोकांनी व्यक्त केल आहे. कारण की राज्यातील बहुतांशी धरणे अजूनही भरलेली नाहीत.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची नजर आता मोठ्या पावसाकडे लागली आहे. अशा विपरीत परिस्थितीत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावं डख यांनी 2 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात कसं हवामान राहणार याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
कसं राहणार हवामान?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता लवकरच पाऊस सक्रिय होणार आहे. 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान राज्यातील दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच 5 सप्टेंबर नंतर विदर्भात पाऊस सुरू होणार आहे.
सहा सप्टेंबरला मराठवाड्यात पाऊस होणार असा अंदाज पंजाबराव यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. तसेच पंजाबरावांनी सहा, सात, आठ सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.
एकंदरीत 2 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.