शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांचा खास मॅसेज ! महाराष्ट्रात नागपंचमीपर्यंत पाऊस पडत राहणार, ‘हे’ 10 दिवस मुसळधार पाऊस होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव 16 ते 17 दिवसांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ब्रेक लावला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. मात्र काल-परवा राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांना आता आगामी काही दिवसात मोठा पाऊस पडणार अशी आशा आहे. आता जर राज्यात मोठा पाऊस झाला तर खरीप हंगामातील संकटात आलेली पिके पुन्हा एकदा उभारी घेतील आणि पिकांना नवीन जीवदान मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही पाऊस पडलेला नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळ पडतो की काय अशी भीती वाटत आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांनी एक खास मेसेज दिला आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही यंदा कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ पडणार नाही.

यावर्षी राज्यात मुबलक पाऊस पडणार आहे, राज्यात जवळपास नागपंचमी पर्यंत आता पाऊस पडेल असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज अर्थातच ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यभर पाऊस पडणार आहे. यानंतर 25 ते 27 ऑगस्ट परत राज्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात हे पुढील दहा दिवस खूप पाऊस पडणार, ज्या भागात आत्तापर्यंत चांगला पाऊस पडलेला नाही तिथे आता पावसाला सुरुवात होईल आणि चांगला पाऊस पडेल असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे. या कालावधीत मात्र राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असून दुष्काळ पडणार नाही असे देखील पंजाबरावांनी यावेळी नमूद केले आहे. 

Leave a Comment