Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कोकण, घाटमाथा तसेच उर्वरित राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे चित्र आहे. खरंतर राज्यात अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नसून राज्यातील बहुतांशी भागात अजूनही पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत.
अशातच आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पंजाब डख यांनी पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाब डख यांनी आता राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आता राज्यात पूर्वेकडून पाऊस दाखल होणार असे त्यांनी स्पष्ट केले असून पूर्वेकडून येणारा पाऊस हा जोरदार राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात 15 जुलै पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत पाऊस होणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून या कालावधीत मात्र सर्वदूर पाऊस न पडता विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आहे.
म्हणजेच या कालावधीमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यानंतर काही दिवस पाऊस पुन्हा विश्रांती घेणार आहे. मात्र 19 जुलै नंतर पुन्हा एकदा परिस्थिती बदलणार आहे.
राज्यात परत पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. निश्चितच राज्यात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.