यावर्षी तूर उत्पादक होणार मालामाल ! ‘या’ कारणाने तुरीच्या दरात येणार विक्रमी तेजी, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate : सध्या बाजारात तुरीला चांगला दर मिळत आहे. राज्यात सध्या चांगल्या दर्जाच्या तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव नमूद करण्यात आला होता.

तुरीच्या दरात विक्रमी तेजी आली असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. कधी नव्हे तो तुरीला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदाच्या खरीप हंगामात तूर लागवडी खालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र यंदा प्रमुख तुर उत्पादक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे.

हेच कारण आहे की तूर लागवडी खालील क्षेत्र वाढण्याऐवजी घटण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात देखील तूर पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला होता. तसेच पिकावर विविध किटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे उत्पादनात घट आली होती.

उत्पादनात घट आणि मागणी मध्ये झालेली वाढ या सर्व पार्श्वभूमीवर सध्या तुरीला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळत आहे. शिवाय या खरीप हंगामात तूर लागवडीखालील क्षेत्र कमी होणार असा अंदाज आहे. यामुळे भविष्यातही तुरीच्या दरात अशीच तेजी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन महत्त्वाची तुर उत्पादक राज्य आहेत. या दोन्ही राज्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे तुरीची लागवड देखील कमी प्रमाणात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तुरीची निम्म्यापेक्षा कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे.

गेल्या हंगामात देशात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १९ लाख ३४ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली होती. तर यंदा केवळ १० लाख ३२ हजार हेक्टर तुरीखाली आले. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात चांगला पाऊस झाला तरचं तूर लागवड वाढेल आणि उत्पादनाचं चित्र आशादायक ठरु शकतं.

अन्यथा तूर लागवड कमी झाली तर यंदाही उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीवरून जर अंदाज लावला तर यंदाही तूर उत्पादन कमीच राहील असं चित्र तयार होत आहे. यामुळे यंदाही तुरीला कधी नव्हे तो विक्रम दर मिळणार असं सांगितलं जात आहे.

Leave a Comment