Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे.
कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
याव्यतिरिक्त अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात अजूनही पुरेसा पाऊस पाहायला मिळत नाहीये. मराठवाड्यात तर परिस्थिती अजूनच बिकट आहे. ओढे नाले वाहून निघतील असा पाऊस अजूनही झालेला नसल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाबाबत आणि येणाऱ्या रब्बी हंगामाबाबत थोडीशी चिंता वाटू लागली आहे.
काही भागात जरूर चांगला पाऊस होत आहे मात्र सर्वत्र जोरदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायमच आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
आज देखील भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशातच पंजाबराव डख यांनी देखील एक हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असं सांगितले आहे.
डख यांनी दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, आज तारीख 23 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार अशी शक्यता आहे. याव्यतिरिक्त 28 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान देखील राज्यात जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. एकूणच राज्यात आता एक ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.