Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जसं की आपण पाहतच आहात की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने मोठा बदल पाहायला मिळत आहे.
तापमानात मोठी चढ-उतार होत आहे. तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे थंडीवर देखील याचा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे.
नोव्हेंबरच्या अगदी सुरुवातीला दोन-तीन दिवस राज्यात थंडीची चाहूल लागली होती. पण, आता पुन्हा एकदा राज्यातून थंडी गायब झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने सध्या राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे.
विशेष बाब अशी की आगामी दोन दिवस महाराष्ट्रात अशीच परिस्थिती राहणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
एकूणच काय की, यंदाची दिवाळी पावसात जाणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 11 नोव्हेंबर पर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जत, विटा, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, दौंड, बारामती, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, वणी, कोपरगाव, निफाड, येवला, मनमाड, नाशिक, वाशिम, कन्नड, सिल्लोड, पुसद, चिखली, जालना, गंगापूर, वैजापूर, माजलगाव, सेलू, परभणी, पूर्णा, वसमत, मुंबई, अहमदनगर, केज, ओझर, धारूर, आंबेजोगाई, नांदेड, हिंगोली, निजामाबाद, देगलूर, उदगीर, ओतूर, जुन्नर, नाशिक, पुणे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त पाऊस अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, निजामाबाद, उस्मानाबाद, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक या भागात पडेल असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे दीपावली नंतर आणखी एक चांगला पाऊस पडेल असेही त्यांनी आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.