मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणार 42 हजार 350 रुपयांचा बोनस, कोणाला मिळणार लाभ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मीपूजनाच्या आधीच एक मोठी घोषणा केली आहे. काल अर्थातच 9 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस ची घोषणा केली आहे.

काल गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना तब्बल 42 हजार 350 रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची महत्त्वाची घोषणा केली असे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएचे मुख्यमंत्री महोदय स्वतः अध्यक्ष आहेत.

दरम्यान त्यांनी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना यंदा 42,350 रुपये एवढा बोनस देण्याची घोषणा केली आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय या संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारा ठरेल यात शंकाच नाही.

गेल्यावर्षी किती मिळाला होता बोनस ?

मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी ३८,५५० रुपये एवढा दिवाळी बोनस देण्यात आला होता. यंदा मात्र दिवाळी सानुग्रह अनुदान अर्थातच बोनसची रक्कम मोठी वाढली आहे.

यावर्षी अनुदानाच्या रकमेत 3,800 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे यंदा या संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असे बोलले जात आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनीही कर्मचाऱ्यांना हा बोनस जाहीर करण्यात आला असल्याने त्यांची यंदाची दिवाळी अधिक गोड होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.

एमएमआरडीएमधील कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या या निर्णयानंतर मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तसेच कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून एम एम आर डी ए आयुक्त मुखर्जी यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत. 

Leave a Comment