महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘या’ रेशन कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी, कोणाला मिळणार लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता वर्तमान शिंदे सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांना मोफत साडी दिली जाणार आहे.

हो बरोबर ऐकताय तुम्ही, आता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांना मोफत साडीचे वितरण केले जाणार आहे. दरवर्षी राज्य शासनाकडून एक साडी भेट म्हणून मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना शासनाच्या माध्यमातून आता दरवर्षी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे.

महिलांना ही साडी मोफत मिळणार असून साडीचे वितरण रेशन दुकानदारांच्या माध्यमातूनच केले जाणार आहे. म्हणजेच आता रेशन दुकानावर फक्त अन्नधान्यच मिळणार नसून अन्नधान्यासोबतच साडीचे देखील वितरण होणार आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे.

या योजनेची विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या साडीचे वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे. राज्य शासन ज्या सणाच्या दिवशी साडीचे वितरण करण्यास सांगेल त्या सणाला अंत्योदय कुटुंबातील महिलांना साडीचे वाटप केले जाणार आहे.

ही योजना राज्यातील राज्य यंत्रमाग महामंडळ यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. महामंडळ यासाठी 355 रुपयाप्रमाणे साडीची खरेदी करणार आहे. 2023-24 या वर्षासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी 355 प्रमाणे साडीची खरेदी होणार आहे. तथापि महामंडळाला हा सारा खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे.

निश्चितच राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक गरीब कुटुंबातील महिलांसाठी घेण्यात आलेला शासनाचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. विशेष बाब म्हणजे शासनाने घेतलेला हा निर्णय पुढील पाच वर्षांसाठी कायम राहणार आहे.

म्हणजेच ही योजना पाच वर्षांसाठी राबवली जाणार आहे. ही योजना 2018 पर्यंत राबवली जाईल अशी माहिती समोर आली आहे.

आपल्या राज्यात 24 लाख 74 हजार 778 अंत्योदय रेशन कार्ड आहेत. यामुळे आता या रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी राज्य शासनाच्या माध्यमातून एक साडी मोफत वितरित केली जाणार आहे. पुढील पाच वर्षे या रेशन कार्डधारकांना हा लाभ मिळत राहणार आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

महिलांना निवडणुकीच्या काळात खुश करण्यासाठी वर्तमान सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी मोफत एक साडी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment