Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यात ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख आणि भारतीय हवामान विभागाने 25 नोव्हेंबर पासून पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाने आणि पंजाब रावांनी वर्तवलेला हा हवामान अंदाज खरा ठरला.
यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये 25 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर पंजाबरावांनी सुरुवातीला राज्यात 28 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याने देखील तसाच अंदाज बांधला होता.
मात्र, 28 तारखे नंतर पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. त्यानुसार आता पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात राज्यात भाग बदलत दोन डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
एकंदरीत राज्यात आता अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी काही काळ लांबला आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गारपीट देखील झाली होती.
यामुळे तेथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता मात्र दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस राहणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेती पिकांची आणि आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहेत.
कुठं पडणार अवकाळी पाऊस
पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात एक डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी ओढे नाले भरून वाहतील असा पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील एक डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात गेल्या महिन्यात गारपीट झाली होती. मात्र, आज उत्तर महाराष्ट्रात कुठेचं गारपीट होणार नसून फक्त पाऊस पडणार असा अंदाज आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रात उद्या म्हणजेच दोन डिसेंबरला धुई येणार आहे.
त्यामुळे तेथील द्राक्ष उत्पादकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मराठवाड्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
मराठवाड्यात अवकाळी पावसाचे प्रमाण मात्र कमी राहणार आहे. पण तरीही पावसाची शक्यता लक्षात घेता तेथील शेतकऱ्यांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.