Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे तांडव नुकतेच थांबले आहे. महाराष्ट्रात 16 मार्चपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले. पण, हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भातच होता. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष बाब अशी की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंजाबरावांनी दिलेला हवामान अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान आता आपण पंजाब रावांनी नेमका काय हवामान अंदाज दिला आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे पंजाब रावांचा हवामान अंदाज?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 28 मार्चपर्यंत ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मात्र या कालावधीत कुठेच पाऊस पडणार नाही. परंतु 28 मार्च नंतर हवामानात बदल होईल आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
29 मार्च ते 31 मार्च दरम्यान राज्यातील कोकण किनारपट्टीत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाची शक्यता आहे. हा पाऊस थेट गोव्यापासून ते नंदुरबारपर्यंत राहील असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना थोडीशी दक्षता या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. याशिवाय नाशिक, इगतपुरी आणि आजूबाजूच्या परिसरात देखील या कालावधीत पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मात्र या कालावधीत उर्वरित राज्यात पाऊस पडणार नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. उर्वरित राज्यात उन्हाची तीव्रता आधीच्या तुलनेत आणखी वाढणार आहे.
एवढेच नाही तर त्यांनी एप्रिलमध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकतो असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.