12 ते 25 ऑक्टोबर दरम्यान कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान, नवरात्र उत्सवात कुठं पडणार पाऊस ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर येत्या काही दिवसात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 15 ऑक्टोबर घटस्थापना होणार असून या दिवसापासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे.

तसेच नवरात्र उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत अर्थातच विजयादशमी पर्यंत राहणार आहे. दरम्यान या नवरात्र उत्सवात पाऊस पडणार का हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कारण की, अनेकदा नवरात्र उत्सवात राज्यात मोठा पाऊस झाला आहे. यामुळे याहीवर्षी नवरात्र उत्सवात पाऊस पडणार का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता.

दरम्यान या प्रश्नाचे उत्तर जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 11 ते 25 ऑक्टोबर दरम्यान हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र नवरात्र उत्सवात काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार नाही.

16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सातार, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड, कोकण या भागात पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण या भागातही खूप मोठा पाऊस पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार असे त्यांनी नमूद केले आहे.

एकंदरीत यंदा नवरात्र उत्सवात महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडणार नसून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु नवरात्र उत्सव झाल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 28 ऑक्टोबर नंतर हवामानात बदल होईल आणि चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिण्न्यात विशेषता दिवाळीच्या काळात चांगला पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment