पुढील 10 दिवस कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? थंडीला केव्हा सुरवात होणार, भारतीय हवामान विभागाचा नवीन अंदाज काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : यावर्षी मान्सून भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये उशिराने दाखल झाला. केरळात उशिराने पोहोचलेला हा मान्सून आपल्या राज्यातही उशिरानेच पोहोचला. राज्यातील तळ कोकणात मानसून 15 ते 16 दिवस मुक्कामाला राहिला.

यानंतर 25 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. परिणाम असा झाला की जून महिन्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. जुनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरूर झाला होता.

यानंतर जुलै महिन्यात राज्यात जोरदार पावसाची हजेरी लागली आणि जून महिन्यातील पावसाची सरासरी भरून निघाली. परंतु पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आणि खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपू लागलीत. महाराष्ट्रावर दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात.

अनेक भागातील पिके सुकलीत. मात्र सप्टेंबर महिना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरला. सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. पण जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला असल्याने यंदा राज्यातील पावसाची सरासरी भरून निघालेली नाही.

अशातच आता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागातून मान्सून परतला आहे. गेल्या महिन्यापासून देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोकण विदर्भसह निम्म्याहून अधिक भागातून मान्सून परतला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे येत्या काही तासात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे.

यामुळे सध्या महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र ऑक्टोबर हिटच्या झळा पाहायला मिळत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक घामाघूम होत आहेत. तापमानात झालेल्या वाढीमुळे आता थंडीला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अशातच भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी आगामी दहा दिवस महाराष्ट्रात कस हवामान राहणार? याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. कश्यपी यांनी सांगितल्याप्रमाणे, पुढील दहा दिवस राज्यात सर्वत्र ऑक्टोबर हिटच्या झळा पाहायला मिळतील आणि मग त्यानंतर हळूहळू तापमानात घट होऊ शकते.

सध्या राज्यातील विदर्भ विभागात तापमान सरासरी ३५ अंश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात सरासरी ३४ अंश आणि मुंबईसह कोकणात सरासरी ३३ अंश सेल्सिअस नमूद केले जात आहे. दरम्यान पुढील दहा दिवस यामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.

यानंतर मात्र राज्यातील तापमान हळूहळू कमी होत जाणार आहे. तापमान कमी झाल्यानंतर मग राज्यात थंडीला सुरुवात होईल असे मत डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केले आहे. अर्थातच महाराष्ट्रात आणखी दहा दिवसानंतर थंडीला सुरुवात होऊ शकते. यावर्षी महाराष्ट्रातून मान्सून वेळेवर माघारी फिरला आहे.

पण गेल्या चार ते पाच वर्षांशी तुलना केली असता यावर्षी 14 दिवस अगोदर मोसमी वारे महाराष्ट्रातून परतले आहेत. याचा परिणाम म्हणून हवेतील बाष्प कमी झाले आहे. यामुळे सूर्याची किरणे आता थेट जमिनीवर येत आहेत. तसेच मोसमी वाऱ्याच्या माघारीनंतर राज्यावर हवेच्या जास्त दाबाची (अॅन्टी सायक्लॉन) स्थिती तयार झाली आहे, या स्थितीत ढगांची निर्माती होत नाही.

शिवाय ॲलनिनोचा देखील प्रभाव आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात यावर्षी परतीचा पाऊस चांगला पडला नाही आणि आता तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. परंतु आता पुढील दहा दिवसानंतर राज्यात थंडीसाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि हळूहळू थंडीमध्ये वाढ होईल असं मत तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment