रब्बीपूर्वी पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला..! नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कस राहणार हवामान, पाऊस पडणार का ? पहा काय म्हटले डख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून तापमान घट आली आहे. तापमान दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. याचा परिणाम म्हणून आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे.

येत्या हंगामातील गहू आणि हरभरा या पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी बांधव आता पुढे सरसावणार आहेत. सध्या रब्बी हंगामाच्या पिक पेरणीपूर्वीच्या जमिनीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात लगबग पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेतीमध्ये पूर्वमशागतीसाठी राबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

खरंतर यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाहीये. सोयाबीन, कापूस, मका समवेतच संपूर्ण खरीप पिकांची पावसाच्या कमतरतेमुळे राखरांगोळी झाली आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांचे सर्व लक्ष रब्बी हंगामावर आहे. ज्या भागात खरीप हंगामामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे तेथील शेतकरी बांधव रब्बीच्या पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत.

पण ज्या ठिकाणी खरीप हंगामामध्ये पाऊसच पडलेला नाही, अगदी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तेथे रब्बी हंगामातील पेरणी होणे थोडे मुश्किल वाटत आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्ह असे व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट दिले आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात आता 26 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यात आजपासून थंडीची तीव्रता वाढेल आणि हळूहळू थंडीची तीव्रता वाढत राहणार आहे. तसेच आता महाराष्ट्रात जवळपास तीन नोव्हेंबर पर्यंत कुठेच पाऊस पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात जवळपास हवामान कोरडे राहणार आहे आणि थंडीचा जोर वाढत राहणार आहे. परंतु यानंतर हवामानात थोडासा चेंज होणार आहे.

हवामानात मोठा चेंज होईल आणि नोव्हेंबर मध्ये एक खूप मोठा पाऊस पडेल असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. विशेषतः नोव्हेंबर मधला हा पाऊस दिवाळीच्या कालावधीत पडू शकतो आणि यामुळे रब्बी हंगामातील हरभरा तसेच गव्हाच्या पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच डिसेंबर महिन्यात देखील एक मोठा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी या आपल्या नवीन हवामान अंदाज वर्तवली आहे.

वास्तविक, भारतीय हवामान खात्याने यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडणार नाही असे आधीच जाहीर केले आहे. म्हणजे पंजाबरावांचा हा हवामान अंदाज हवामान खात्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आता भारतीय हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो की पंजाबरावांचा हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. मात्र शेतकरी बांधवांना पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरावा आणि अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस पडावा जेणेकरून रब्बी हंगामातील पिकातून बऱ्यापैकी उत्पादन मिळेल असे वाटतं आहे.

Leave a Comment