बातमी कामाची ! दिवाळीच्या काळात देशातील बँका ‘एवढ्या’ दिवस राहणार बंद, RBI ने दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. खरतर पुढील महिन्यात अर्थातच नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारात खरेदीला वेग आला आहे. बाजारांमधील चमक आता दिवसेंदिवस वाढणार आहे. दिवाळी सणामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.

पण दिवाळीच्या काळात देशभरातील बँका बंद राहणार आहेत. RBI कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात देशातील बँका तब्बल 15 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. देशातील बँकांना पुढील महिन्यात पंधरा दिवसांसाठी सुट्टी राहणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात बँक ग्राहकांना या सुट्ट्याअनुसार आपल्या बँकेतील कामांची नियोजन करावे लागणार आहे.

पंधरा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असणाऱ्या फिक्स सुट्ट्याचा देखील समावेश राहणार आहे. एकंदरीत दिवाळी सणाच्या काळात देशातील बँकांना अनेक दिवस सुट्ट्या राहणार असल्याने बँकेतील ग्राहकांना आपल्या बँकेच्या कामाचे आत्तापासूनच नियोजन करावे लागणार आहे. आता आपण नोव्हेंबर महिन्यात देशातील बँका किती दिवस बंद राहतील याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार

1 नोव्हेंबर : महिन्याच्या सुरुवातीलाच कन्नड राज्योत्सव मुळे कन्नड राज्यात, इम्फाळ आणि शिमला येथे बँका बंद राहणार आहेत.

पाच नोव्हेंबर : पाच नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशभरात बँकेला सुट्टी राहील.

10 नोव्हेंबर : या दिवशी गोवर्धन पूजा, लक्ष्मी पूजा आणि दिवाळी निमित्त देशातील बँका बंद राहतील.

11 नोव्हेंबर 2023 : या दिवशी दुसरा शनिवार राहणार आहे यामुळे देशभरातील बँका या दिवशी बंद असतील.

12 नोव्हेंबर : रविवार असल्याने या दिवशी देशातील बँका बंद राहणार आहेत.

13 नोव्हेंबर : या दिवशी लक्ष्मी पूजा/ दिवाळीमुळे आगरताळा, देहरादून, गंगा टोक, इम्फाळ, जयपुर, कानपूर लखनऊ या ठिकाणी बँका बंद राहणार आहे.

14 नोव्हेंबर : या दिवशी दिवाळी/लक्ष्मीपूजनामुळे देशातील बहुतांशी भागात बँका बंद राहणार आहेत. अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकां यादिवशी बंद राहणार असे आरबीआय कडून सांगितले गेले आहे.

15 नोव्हेंबर : या दिवशी भाई दूज / चित्रगुप्त जयंती / निंगल चक्कूबा / भ्रात्री द्वितीया या सणामुळे गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद राहणार आहेत. 

19 नोव्हेंबर : रविवार असल्याने संपूर्ण देशभरात बँकेला सुट्टी राहणार आहे.

20 नोव्हेंबर : छटपूजा निमित्ताने पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआयकडून समोर आली आहे.

23 नोव्हेंबर : या दिवशी सेंग कुट स्नेम / इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

25 नोव्हेंबर : या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

26 नोव्हेंबर : रविवार मुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

27 नोव्हेंबर : या दिवशी गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे देशातील विविध भागातील बँका बंद राहणार आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.

30 नोव्हेंबर : या दिवशी कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहणार?

आपल्या राज्यात 5, 12, 19 आणि 26 नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. याशिवाय 11 आणि 25 नोव्हेंबर रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. यासोबतच 14 नोव्हेंबर रोजी दीपावली पाडवा बलिप्रतिपदा या निमित्ताने राज्यातील बँका बंद राहतील. शिवाय 27 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने या दिवशी राज्यातील बँका बंद राहणार आहेत. म्हणजे आपल्या राज्यात नोव्हेंबर महिन्यात आठ दिवसांसाठी बँका बंद राहतील.  

Leave a Comment