पंजाबरावांनी दिली गुड न्यूज ! महाराष्ट्रात पुढील 6 दिवस पाऊस होणार, पण ‘या’ भागातच जोरदार पडणार; डख काय म्हटले?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची तीव्रता वाढली आणि जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला होता म्हणून खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला.

शिवाय त्यावेळी ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाला खताची मात्रा दिली. महागड्या औषधांची देखील फवारणी केली. पण ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला.

आता ऑगस्ट महिना येत्या 6 दिवसात संपणार आहे तरीही या महिन्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 11 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 25% पावसाची कमी नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

शिवाय पुणे वेधशाळेने ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडणार नाही असे स्पष्ट केले आहे. पण पुणे वेधशाळेने पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज बांधला आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 30 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बोरगाव, अंजनगाव सुर्जी, वासिम, रिसोड, पुसद, कळमनुरी, औंढा, जिंतूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, टेंभुर्णी, हसनाबाद, जाफ्राबाद, सिल्लोड, माहूरगाव, जळगाव, चाळीसगाव, वैजापूर, धुळे, मालेगाव, अमळनेर, पाचोरा, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, अहमदनगर, आष्टी, राहुरी, जालना, संभाजीनगर, मंठा, पाथर्डी, गेवराई, बीड, पाटोदा, करमाळा, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, परंडा, अकलूज, सांगली, म्हसवड, कामठी, लातूर, शिरूर, जळकोट, श्रीगोंदा, उस्मानाबाद, पाथर्डी या भागात 30 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील परभणी, संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बीड, पंढरपूर, लातूर, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. 

Leave a Comment