Panjabrao Dakh Latest News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा त्राहीमाम सुरु आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. हा अवकाळी पाऊस हाता-तोंडाशी आलेला घास हिरावणार असे सांगितले जात आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष, केळी आणि कांदा समवेतच इतर शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. नाशिक जिल्ह्यात तर गारपीट झाली आहे म्हणून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
दरम्यान काल पासून अवकाळी पावसाचे वातावरण हळूहळू निवळण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण अजूनही महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.
हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील मध्य भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा व विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
सोबतच आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी देखील राज्यातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी राज्यात दोन डिसेंबर पर्यंत कसे हवामान राहणार याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अजूनही अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे गेलेले नाही. राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात आता 2 सप्टेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे.
काही भागांमध्ये एक सप्टेंबर पर्यंत तर काही ठिकाणी दोन सप्टेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भसहित विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत पडणारा पाऊस मात्र सर्व दूर पडणार नाही. या कालावधीत भाग बदलत पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच या कालावधीत विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.